मतदार याद्यांवरील हरकती बाबत निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ( NMC Elections )वापरण्यात येणार्‍या शहरातील एकूण 44 प्रभागांची प्रारूप मतदार ( Voter List )यादी महापालिका प्रशासनाने जाहीर करून त्याच्यावर हरकती मागवल्या होत्या. 11 दिवसांमध्ये 3851 हरकती महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत.

महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन मागवले होते. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त युपीएस मदान (State Election Commission Commissioner UPS Madan) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मतदार याद्यांवर आलेल्या हरकती बाबत मार्गदर्शन केले.

ज्या लोकांनी अगोदर विधानसभा मतदार यादीत आपल्या नावाची, पत्त्याची किंवा इतर दुरुस्ती केलेली नसेल तर ती दुरुस्ती करण्याच्या अधिकार महापालिकेला नाही. कोणत्याही प्रकारे फेरफार महापालिका करू शकत नाही, अशा सूचना मदान यांनी महापालिका अधिकार्‍यांना दिल्या

नऊ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करायची आहे. त्यामुळे कमी काळात जास्त काम महापालिका अधिकारी व सेवकांवर आले आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात हरकतींचा पाऊस झाल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अशा वेळी हरकतींचा निपटारा कशा पद्धतीने करायचा याबाबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निवडणूक आयोगाचे मदान यांनी स्वतः महापालिका प्रशासन अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

ज्या लोकांनी विधानसभा मतदार यादीत आपल्या नावाच्या माहितीची दुरुस्ती केलेली नसेल त्यात बदल करण्याचा महापालिकेला अधिकार नाही. यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी निकाली काढण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे मतदार यादीवर आलेल्या हरकती संदर्भात आजही महापालिका आयुक्तांनी सातपूर परिसरात दौरा करून पाहणी केली. तसेच जे 44 पथक तपासणीसाठी तसेच स्थळ पाहण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत त्यांची कामेदेखील क्रॉस चेक करून घेतली.

हाजी मुजाहिद शेख यांच्याकडून हरकत

आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनपाचे यादी प्रसिद्ध करून त्याच्यावर हरकती दाखल करण्यात आले आहे. जूने नाशिक येथील प्रभाग क्रमांक 20 मध्ये असलेल्या मतदारांचे नाव प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग क्रमांक 19 यामध्ये जवळपास 900 पेक्षा जास्त मतदारांचे नाव गेले आहे. त्यामुळे हाजी मुजाहिद यांनी याबाबत हरकत घेऊन महापालिका प्रशासन उपायुक्त मनोज-घोडे पाटील यांना निवेदन दिले आहे.

23 जून रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती तर त्याच्यावर एक जुलैपर्यंत हरकत घेण्याची मुदत होती. मात्र आयुक्तांनी त्याट तीन दिवसांची वाढ करून 3 जुलै पर्यंत हरकती स्वीकारल्या. जूने नाशिक परिसरातील अनेक प्रभागांमध्ये मतदार यादीच्या घोळ असल्याचे दिसून आले आहेत. प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 18, प्रभाग क्रमांक 19 आदी प्रभागांमध्ये शेकडो नावांचा घोळ आहे. यामुळे तक्रारी देण्यात आले आहेत. हाजी मुजाहिद शेख यांनी दिलेल्या तक्रारीच्या वेळी इस्माईल शेख, मुबिन शेख, हुसेन शेख, हमिद शेख ,अब्दुल पटेल,इम्रान शेख,साजिद शेख ,राशीद खान,सैफ जीन,इम्रान खान,गुलाम खान आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *