सुपीकता टिकवण्यासाठी हवे मार्गदर्शन

सुपीकता टिकवण्यासाठी हवे मार्गदर्शन

घोटी । प्रतिनिधी | Ghoti

सुपीक शेती (Fertile farming) करण्यासाठी त्यातील मातीला अनन्य महत्व आहे. माती (soil) चांगली असेल तरच भरभरून पीक (crop) येते. त्यामुळे माती परिक्षणाला (Soil testing) महत्व प्राप्त झाले आहे. माती चांगली नसेल तर पीक व धान्य ऊत्पादनात मोठी घट होताना दिसत आहे. रासायनिक खतामुळे (Chemical fertilizer) शेतीतील माती घोक्यात आली आहे यासाठी शेतकर्‍यांना (farmers) योग्य मार्गदर्शन (Guidance) मिळणे गरजेचे आहे जेणेकरून शेतीची सुपीकता टिकवता येऊ शकते.

- जनार्दन माळी, माजी जि. प. सदस्य तथा शेतकरी

बळीराजा टिकला तरच शेती वाचेल

भारतामधील सर्वच राज्यांमधे शेतीला महत्व असुन बळीराजा टिकला तरच शेती वाचेल अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अनेक ठीकाणी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतातील चांगली माती या पाण्याबरोबर वाहुन जात असल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील मुलायम थर कमी होऊन शेतीचा -हास होतांना दिसत आहे. यासाठी वेळीच उपाययोजना होणे गरजेचे असुन पावसाच्या पाण्यामुळे वाहुन जाणारी माती राखायला हवी, शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे. आपल्या शेतातील माती कशी वाचवावी या उपक्रमास योग्य मार्गदर्शन लाभल्यास शेती करणे लाभदायक ठरणार आहे.

- संपतराव काळे, माजी सभापती, कृषि ऊत्पन्न बाजार समिती, घोटी तथा सधन शेतकरी

उत्पन्नात भर कशी पडेल?

कधी अतिवृष्टी (heavy rain) तर कधी पावसाचा लपंडाव या पावसाच्या लहरीपणामुळे पुर्वपार दैनंदिन शेती (farming) करणे घाट्याचे होत चालले आहे. बारा महिने सतत पीक घेतल्यामुळे शेतातील माती धोक्यात आली आहे. त्यातच रासायनिक खतांच्या मार्‍यामुळेही मातीची सुपीकता (Soil fertility) नष्ट होऊन पीक ऊत्पदनात मोठी घट होत आहे. त्यामुळे उत्पादनाचा खर्च जास्त होत असुन बाजारभाव कमी मिळत असल्याने शेती व्यवसाय एक प्रकारे धोक्यात आला आहे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. माती वाचवण्यासाठी शासनाने कृषिविषयक मार्गदर्शन (Agricultural guidance) करावे आणि शेतीच्या ऊत्पनात भर कशी होईल याकडे लक्ष वेधने गरजेचे आहे.

- पांडुरंग वारूंगसे, माजी प. स. उपसभापती तथा शेतकरी

शेती कशी करावी?

इगतपुरी तालुक्यात (igatpuri taluka) भात ऊत्पदनाचे मोठे क्षेत्र आहे. तालुक्यात पावसाळ्यात सतत चार महिने पाऊस पडत असल्याने भात, वरई, नागली आदी ऊत्पनासाठी पोषक वातावरण असते. या ठीकाणी भात शेती वर्षानुवर्ष केली जात आहे. मात्र कधी कधी अतिवृष्टीमुळे (heavy rain) संपुर्ण भातपीक वाहुन जाण्याच्या घटना घडल्या आहेत. या बरोबरच चांगली मातीही या पावसाच्या पाण्याबरोबर वाहुन जात आहे. यासाठी शेतकर्‍यांसाठी शेतीतील नवे प्रयोग पोहचवण्याची व विषयुक्त शेती कशी करावी ही सांगण्याची वेळ आली आहे. यासाठी माती (soil) पाहुन कधी व कोणते ऊत्पादन घेणे फायदेशीर ठरेल याबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

- विष्णु पोरजे, माजी उपसरपंच तथा शेतकरी, शेवगेडांग

जमीनीला विश्रांती मिळत नाही!

पुर्वी पावसाळ्यात इगतपुरी तालुक्यात चार महिने शेत जमिनीवर फक्त भाताचे ऊत्पादन घेतले जात होते. त्यामुळे चार महिन्यानंतर आठ महिने शेत जमीन तशीच खाली राहात हाती. त्यामुळे जमिनीची झीज अगदी कमी प्रमाणात होत असल्यामुळे मातीची सुपीकता (Soil fertility) टिकुन राहात होती. त्यामुळे पुर्वी भातपिकाचे ऊत्पादन मोठ्या प्रमाणात मिळत असे. मात्र काही वर्षापासुन पाण्याचे स्त्रोत मिळत असल्याने या भागातील शेतकरी आता बागायती शेतीकडे वळल्याचे पाहावयास मिळत आहे. चार महिने पडणार्‍या पावसानंतर आता आठ महिने येथील शेतकरी आता मिरची, काकडी, टमाटे, भोपळा, कारले, दोडके गिलके, वांगे आदी भाजी पाल्याचे मोठे उत्पादन घेत आहे. मात्र यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने शेतातील माती निकृष्ट होत असल्याने या मातीची सुपीकता टिकवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे.

- सोमनाथ जोशी, पंचायत समिती सभापती तथा शेेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com