Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकची विमानसेवा सक्षम करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे

नाशिकची विमानसेवा सक्षम करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या विमानसेवेला गती देण्यासाठी To speed up Airlines services from Nashik उद्योजकांसोबतच शासकीय स्तरावरुनही प्रयत्न केले जात आहेत.खुद्द पालकमंत्र्यांनी याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांशी संवाद साधून यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

‘उडे देशका हर इन्सान’ या संकल्पनेवर उडान योजना लागू करण्यात आली होती.त्याअंतर्गत नाशिकहुन अहमदाबाद,पूणे,बेलगाम,दिल्ली, बंंगळुरु,हिंदण याशहरांसाठीच्या विमानसेवा सूरळीत सूरू होत्या. प्रवाश्यांचाही प्रतिसाद चांगला होता.

मात्र सलग दोन वर्ष कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच सेवा ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर ट्रयूजेट व एअर अलायन्स या विमान कंपन्यांनी अहमदाबाद, बेळगाव, पूणे या सेवा सूरू ठेवल्या. मात्र स्पाइसजेट, इंडीगो यांच्या सेवा सूरू झाल्या नाहीत.त्यामुळे मोठी मागणी असतानाही दिल्ली, बंगळुरु, हिंदण या सेवा प्रलंबित राहिल्या.परिणामी प्रवाश्यांना अहमदाबादवरुन विमानसेवा घ्यावी लागते.

याबाबत जिल्हाचे पालकमंत्री छगन भूजबळ Guardian Minister Bhujbal यांनी नागरी उड्डयन मंत्री Minister of Civil Aviation ज्योतीराजे सिंधीया Jyotiraje Scindia यांच्याशी संवाद साधून त्यांना उडान अंतर्गत नोंदणी केलेल्या विमान कंपन्यांना सेवा सूरू करण्याचे सांगण्याची विनंती केली.

यामुळे येणार्‍या काळात नाशिक हुन स्पाईस जेटच्या माध्यमातून दिल्ली, बंगळूरू, हैद्राबाद, गोवा या सेवा सूरू होऊ शकतील, तर इंडीगोच्या माध्यमातून हिंदण, भोपाळ, बंगळुरु या सेवा कार्यान्वित होतील. स्टार एअरच्या माध्यमातून सिंधूदूर्ग सेवा सूरू होण्यास मदत होईल.

एमआरओ प्रलंबित

नाशिक विमानतळावर एचएएलच्या माध्यमातून विमान दूरुस्ती देखभाल व ओव्हर ऑलिंग ( एमआरओ) ही सूविधा निर्माण केलेली आहे. मात्र या सुविधेचा लाभ घेतला जात नाही. सद्य स्थितीत विमान कंपन्या एमआरआसाठी परदेशात विमान पाठवत आहेत. एचएएलचा लढाऊ विमान बनवण्याचा कारखाना असल्याने याठिकाणी विमानाचे एमआरओ करण्याची सर्व सुविधा उपलब्ध आहे. विमान कंपन्यांची त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे.-

मनिष रावल (उद्योजक)

- Advertisment -

ताज्या बातम्या