Thursday, April 25, 2024
Homeजळगावदेवकरांकडून पालकमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम

देवकरांकडून पालकमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Jalgaon Agricultural Produce Market Committee) निवडणुकीत (election) राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर (Former NCP Minister Gulabrao Deokar) यांनी शिंदे गटाचे (Shinde group) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांचा करेक्ट कार्यक्रम (correct program) केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीने 18 पैकी 11 जागांवर विजय मिळवून भाजपा-शिंदे गट युतीचा दणदणीत पराभव केला. दरम्यान जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील हा पराभव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

धुळे-दादर त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वेला सुरवात
…. तर जळगाव शहर पुन्हा खड्ड्यात जाणार?

जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आज अत्यंत धक्कादायक ठरला. या निवडणुकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपा आणि शिंदे गटाने युती करून ही निवडणूक लढविली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही युतीला कडवे आव्हान दिले होते.

धुळे बाजार समितीवर आ.कुणाल पाटील यांचे वर्चस्व

मविआने उघडले विजयाचे खाते

सकाळी पहिला निकाल हा अनूसुचित जाती जमाती मतदारसंघाचा जाहीर करण्यात आला. यात महाविकास आघाडीचे दिलीप कोळी 329 मते घेत युतीच्या उमेदवार ललिता कोळी यांचा दणदणीत पराभव करून विजयाचे खाते उघडले.

सोसायटी मतदारसंघात काट्याची टक्कर

सोसायटी मतदारसंघातून सात जागा निवडुन द्यावयाच्या होत्या. या मतदारसंघात मविआ आणि युतीच्या उमेदवारांमध्ये काट्याची लढत झाली. या लढतीत महाविकास आघाडीचे सहा तर भाजपाचा एक उमेदवार निवडुन आला.

पाचोरा-भडगाव कृउबास वर युतीचा झेंडा
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निकालात गोंधळ

पालकमंत्र्यांसाठी धक्कादायक निकाल

जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 11 जागा मिळवून सत्ता खेचून आणली. राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली मविआच्या उमेदवारांनी नियोजनावर भर दिल्याने निवडणुकीत त्याचे चांगले परिणाम दिसले. पालकमंत्र्यांच्या ताब्यात असलेली बाजार समिती महाविकास आघाडीने खेचून पालकमंत्र्यांना मोठा धक्का दिला आहे.

गुन्हेगारी टोळीतील 7 जण दोन वर्षांसाठी हद्दपार

राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकवर राहीला आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्हाला दुपटीने यश मिळाले आहे. ग्रामीण भागातील जनतेने शिंदे सरकारच्या खोके संस्कृतीला साफ नाकारले आहे. सत्तेशी संघर्ष करून आम्ही बाजार समित्यांच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने जे पक्षातून फुटून गेले त्यांना मतदारांनी जागा दाखविली आहे. बाजार समितीच्या निवडणुका ह्या विधानसभेचे प्रतिबिंब असतात. त्यामुळे आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. मुक्ताईनगर तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील हे चाळीसगावचे पार्सल आहेत. हे पार्सल येत्या विधानसभेत सुखरूप परत पाठविले जाईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली.

आ.एकनाथराव खडसे

जिल्ह्यात 12 बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल लागले. त्यात महायुतीला सहा बाजार समित्यांवर यश मिळविता आले. त्यामुळे या निकालाबाबत आम्ही समाधानी असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच जळगाव बाजार समितीत गत निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल होते. यावेळेला आम्ही स्वतंत्र लढलो. तरी देखिल युतीचे सहा उमेदवार निवडुन आले. काही जागांवर झालेला पराभव मान्य आहे. ज्या चुका झाल्या त्या दुरूस्त करून पुन्हा जोमाने कामाला लागू असेही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

ना.गुलाबराव पाटील, पालकमंत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या