Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात निर्बंधमुक्त 'रंगपंचमी'; रहाडींनाही मिळणार परवानगी

नाशकात निर्बंधमुक्त ‘रंगपंचमी’; रहाडींनाही मिळणार परवानगी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात (Nashik City) दोन वर्षांच्यानंतर निर्बंधमुक्त रंगपंचमी (Rangpanchami) होणार आहे. चाळीस हजार पेक्षा अधिक नाशिककरांनी शहराच्या बाहेर जाऊन लसीकरण केले आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या आणखी वाढणार आहे. म्हणून, निर्बंधमुक्तीचा निर्णय जिल्हास्तरावर घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे….

- Advertisement -

आज पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian minister chhagan bhujbal) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आढावा बैठक (Review Meeting) घेतली. यावेळी ते बोलत होते. नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरण देवराजन (Nashik Collector Gangatharan Deorajan) यांच्या उपस्थितीतील ही पहिलीच बैठक झाली.

यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून नाशिककरांनी घरात राहूनच रंगपंचमी (Rangpanchami) साजरी केली आहे. आता नाशिकमधील करोनाचे वातावरण निवळले आहे. नाशिकमध्ये ७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पाझिटीव्ह रेट हा ०.५ टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे आता करोना नाही तर इतर कारणांकडे लक्ष देऊ असे भुजबळ याप्रसंगी म्हणाले.

यापुढे बोलताना ते म्हणाले की, ५० हजार रुपयांच्या करोना मदत निधीसाठी १५ हजार २३३ प्रस्ताव आले होते. त्यातील ९ हजार ६६४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर ४हजार ४६८ प्रस्तावांची तपासणी सुरु आहे. तर १ हजार ८३ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.

दुसरीकडे नाशकात ८४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ६२ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. ४० हजार पेक्षा अधिक नागरिकांनी जिल्हाबाहेर जाऊन लसी टोचून घेतल्यामुळे ही आकडेवारी आणि टक्केवारी आणखी वाढणार आहे. त्यामुळे लवकरच नाशिक शहर निर्बंधमुक्त जाहीर होणार आहे.

रंगपंचमीला परवानगीची आवश्यकता असून सोमवारी शहराचे पोलीस आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यावर सकारात्मक असा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे यंदा रंगपंचमी उत्साहात साजरी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या