शहर खड्डे मुक्त करण्यासाठी पालकमंत्री भूसेंचा 'अल्टिमेटम'

शहर खड्डे मुक्त करण्यासाठी पालकमंत्री भूसेंचा 'अल्टिमेटम'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर खड्डे (potholes) मुक्त करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी पंधरा दिवसांची मुदत महापालिका प्रशासना (Municipal administration) दिली होती, ती संपत आली असती तरी शहरातील अनेक मार्गांवर खड्डे (potholes) होतेच.

याबाबत आज दैनिक देशदूत (deshdoot) मध्ये वृत्त प्रसिद्ध होतात महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागात खड्डे (potholes) बुजवण्याबरोबरच डांबरीकरणला सुरुवात केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान दिसून आले. दरम्यान अनेक मार्गांवर अद्यापही डांबरीकरण झाले नसल्यामुळे महापालिकेने तिथेही लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

नाशिक शहरात यंदा पावसाचा (rain) मुक्काम वाढला होता, त्यामुळे शहरातील बहुतेक सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे (potholes) पडले होते. खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. यामुळे विविध राजकीय पक्षांनी वेळोवेळी आंदोलन (agitation) देखील केले. होते मात्र तात्पुरते स्वरूपात खड्डे बुजवण्याची कारवाई मनपाकडून करण्यात आली, मात्र कायमचा उपाय त्याच्यावर काढण्यात आला नव्हता.

त्यामुळे संतप्त झालेल्या पालकमंत्री भुसे यांनी पंधरा दिवसातील खड्डे बुजवा अन्यथा कारवाई होणार असे आदेश दिले होते. त्यांच्या अल्टिमेटची मुदत संपत आली होती तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे होते. याबाबत देशदूतने वृत्त प्रसिद्ध केले. आता शहरात विविध भागात डांबरीकरण करण्यात येत आहे.

"त्या' चौकाकडे विशेष लक्ष

शहरातील मिर्ची चौकात झालेल्या अपघाता नंतर मनपाकडून ब्लॅक स्पॉटवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पंचवटी विभागातील मिर्ची चौकात पश्चिम-दक्षिण कोप-यातील फॅनिंग पूर्ण झाले असून इतर तीन कोप-यातील फॅनिंग पूर्ण करण्यासाठी ई-टेंडर काढले जाणार आहे. 200 मीटरपर्यंत रस्ता रुंद होणार आहे. डिव्हायडर टाकणे, कॅट आय, प्रकाशमान करणे, दृश्यमानता वाढविणे, फूटपाथ करणे अशी कामे केली जाणार आहेत. गोदावरी नदी पात्र ते मिर्ची चौक (इनर रिंग रोड) दरम्यान रस्ता दुरुस्तीही करण्यात आली आहे. नांदूर नाका चौकातही सुधारणा सुरु आहे. या चौकातील रस्त्यावर थर्मो प्लॅस्टिकने झेब्रा कॉसिंग पट्टे मारण्यात आले आहेत. कॅट आयचेही काम होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com