Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापालकमंत्र्यांना महिलांचा घेराव

पालकमंत्र्यांना महिलांचा घेराव

सिन्नर । वार्ताहर Sinnar

नगर परिषद ( Sinnar Town Council )हद्दीतील गायरान व शासकीय जागेवरील सुमारे 411 अतिक्रमणधारकांना नगर परिषदेने अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. यासाठी अतिक्रमणधारक महिलांनी एका कार्यक्रमासाठी शहरात आलेल्या पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse)यांना घेराव घालत अतिक्रमण निर्मूलन मोहिम(Encroachment Eradication Campaign) थांबवण्याची मागणी केली. नगर परिषदेकडून अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावत दहा दिवसांच्या आत अतिक्रमण काढून न घेतल्यास नगर परिषद अतिक्रमण काढणार असून त्यावर होणारा खर्च संबंधितांकडून वसूल करणार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

शहर व परिसरात शासनाच्या नावे दाखल असलेल्या जमिनीवर बर्‍याच नागरिकांनी वर्षानुवर्षे अनधिकृतपणे कब्जा करून अतिक्रमण केलेले आहे. शासनाकडे विहित असलेल्या कोणत्याही जमिनीचा अनधिकृतपणे भोगवटा करणार्‍या व्यक्तीस निष्कसित करण्याची तरतूद कायद्यात आहे. मुंबई उच्च न्यायालयानेच यासंदर्भाने आदेश पारित केलेले असल्याने राज्यभरात अतिक्रमणधारकांविरुद्ध कारवाई होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर परिषदेने कारवाई सुरु केली असून 411 अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या आहेत. यामुळे एका कार्यक्रमासाठी आलेल्या ना. भुसे यांना अतिक्रमणधारक महिलांंसह भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे व पदाधिकार्‍यांनी घेराव घालत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हांडे यांनी फोनवर चर्चा केली. त्यावर गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटाव कारवाईस सध्या स्थगिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती हांडे यांनी दिली. भुसे यांनीही यावर तोडगा काढण्याचे आश्वासन महिलांना व भाजप पदाधिकार्‍यांना दिले.

राहण्याची व्यवस्था करावी

आम्ही गेले 35-40 वर्षांपासून येथे राहत आहोत. आमच्या मुला-मुलींचे लग्नही येथेच झाले. आम्हाला शेतीवाडी नाही. उत्पन्नाचे शाश्वत साधन नाही. शासनाने आमची राहण्याची पर्यायी व्यवस्था करावी जेणेकरुन आमचे कुटुंब रस्त्यावर येणार नाही. आमचा संसार घेऊन आम्ही कुठे जायचे. – ताराबाई शिरसाठ, सिन्नर

नाशिक तालुक्यात 2,216 जणांचे अतिक्रमण

तालुक्यातील गायरानावरील जमिनीवरील 2058 अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून तहसीलदारांंकडे नोटीसांना उत्तर देण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आल्याने आता 28 नोव्हेंबरचा टाईमबॉन्ड पाळण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने राज्यभरातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या समित्या बैठकांवर बैठक घेत आहे. तर नोटीसांना सात दिवसात उत्तर देण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे. नाशिक तालुक्यात 2216 जणांचे अतिक्रमण आहे

.त्यातआंबे बहुला, दुगाव, मुंगसरे,म्हसरुळ,विल्होळी, जातेगाव, लाखलगाव, महादेवपूर, जलालपूर, दरी, गणेशगाव, सय्यद पिंप्री,बेलगाव ढगा, देवळाली येथील ग्रामस्थांचा समावेश आहे. सर्वाधीक अतिक्रमण सय्यद पिंप्रीत 867 जणांंचे आहे.743 जणांनी आतापर्यत ंनोटीसीला उत्तर दिले आहे. नाशिक विभागातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढून घेण्यासाठी सध्या नोटीस बजावण्याची मोहीम सुरु असून, त्यातून प्रत्यक्ष काय निष्पन्न होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.नाशिक विभागात 474जणांनी अतिक्रमण काढले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या