GST संकलनात महाराष्ट्र पुन्हा अव्वल!

GST संकलनात महाराष्ट्र पुन्हा अव्वल!

दिल्ली | Delhi

देशात गेल्या महिन्यात एकुण १ लाख ५१ हजार ७१८ कोटी रुपये जीएसटी कर संकलन झालं असून ही रक्कम या वर्षात आतापर्यंत जमा झालेल्या जीएसटी कराची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक रक्कम आहे. देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जमा झाला.

या वर्षात दुसऱ्यांदा जीएसटी कराच्या संकलनानं दीड लाख कोटीचा टप्पा ओलांडला असून याआधी एप्रिल महिन्यात हा टप्पा ओलांडला गेला होता. अर्थमंत्र्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात २६ हजार ३९ कोटी रुपये सीजीएसटी, ३३ हजार २९७ कोटी रुपये एसजीएसटी तर ८१ हजार ७७८ कोटी रुपये आयजीएसटी कर संकलित करण्यात आला.

यामध्ये ३७ हजार २९७ रुपये परदेशी मालाच्या आयातीवरच्या करातून तर सेस रुपानं संकलित केलेल्या सेसचा तर ८२५ कोटी रुपये आयातीत वस्तूंच्या करापोटी गोळा झालेल्या निधीचाही समावेश आहे. केंद्र सरकारनं केंद्र आणि राज्याच्या पन्नास पन्नास टक्के विभागणी नुसार २२ हजार कोटी रुपये अदा केले असल्याचंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. गेल्या ऩऊ महिन्यांपैकी सलग ८ महिन्यांमध्ये जीएसटी कर संकलन १ कोटी ४० लाख कोटी रुपयांच्या वर राहिलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातून सर्वाधिक कर संकलन

ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक जीएसटी संकलन हे महाराष्ट्रातून झाले. महाराष्ट्रातून २३ हजार ३७ कोटींचा जीएसटी जमा झाला. तर, कर्नाटकमधून १० हजार ९९६ कोटींचा कर जमा झाला. गुजरात राज्यातून ९ हजार ४६९ कोटींचा जीएसटी जमा झाला. उत्तर प्रदेशातून ७ हजार ८३९ कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com