गट, गण प्रारूप आराखडा आज होणार प्रसिद्ध

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचेही ( Zilla Parishad Elections ) पडघम सुरू झाले आहेत.संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेनेही आता जोर धरला आहे. जिल्हा परिषदेच्या 84 गटांचे आणि 15 पंचायत समित्यांच्या ( Panchayat Samiti ) 168 गणांच्या प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखडयास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मान्यता दिली आहे. जिल्हाधिकार्‍यांकडे सादर झालेला हा प्रारूप आराखडा (Draft outline) गुरूवारी (दि.2) प्रसिध्द करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन आठवडयात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या दि.4 मे रोजी झालेल्या सुनावणीमध्ये देण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणूक पूर्व तयारीला वेग आला. राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2022 मध्ये राबवलेला गट-गण प्रारुप आराखडा कार्यक्रम रद्द करत, जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण प्रारुप रचनांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता.

यात आता गट-गणांचे प्रारुप आराखडे मान्यतेचे अधिकारी विभागीयपंचायत समिती गट व गण प्रारुप रचनांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता.

यात आता गट-गणांचे प्रारुप आराखडे मान्यतेचे अधिकारी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 23 मे रोजी जिल्हा प्रशासनाने प्रारूप गट, गण रचना तयार करून विभागीय आयुक्तांना सादर करणे क्रमप्राप्त होते. मात्र, हा प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाकडून वेळेत सादर न होता 25 मे रोजी सादर झाला.दि.26 ते 31 मे दरम्यान या प्राप्त आराखडयाच्या पडताळणी झाली असून, काही तांत्रिक दुरूस्त्या करत विभागीय आयुक्तांनी या प्रारूप आराखडयास मान्यता दिली आहे.

मान्यता दिलेला आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. 31 मे रोजी उशीराने दाखल झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून गुरूवारी (दि.2)हा प्रारूप आराखडा सामान्यांसाठी प्रसिध्द केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह, तालुकास्तरावर तहसिल कचेरी, पंचायत समितीस्तरावर देखील आराखडा लावण्यात येणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *