Monday, April 29, 2024
Homeजळगावबोदवड, यावल, भुसावळसह जामनेर तालुक्यातील भूजल पातळी घटली

बोदवड, यावल, भुसावळसह जामनेर तालुक्यातील भूजल पातळी घटली

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून मे महिन्यात भूजल पातळीची (Groundwater level) नोंद घेण्यात आली. त्यात जिल्ह्यातील बोदवड, यावल, भुसावळ (Bodwad, Yaval, Bhusawal) आणि जामनेर (jamner) तालुक्यातील भूजल पातळीत 0.35 मीटरने घट झाली असून इतर तालुक्यात पाण्याची पातळी समाधानकारक असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

- Advertisement -

Murder खर्चासाठी पैसे देत नसल्याने मुलांनीच बापाला संपवले

मे महिन्यात तापमानाचा पारा 45 अंशापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी देखिल कमी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तसेच जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. भूगर्भातील पाणीसाठा नेमका किती कमी झाला याची नोंद वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून घेतली जाते. साधारणत: तीन टप्प्यात ही नोंद घेण्याचे काम होते. मे महिन्यात घेतली जाणारी नोंद ही जिल्ह्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. या नोंदीनुसारच प्रशासकीय स्तरावर पाण्याचे नियोजन केले जाते.

धुळ्यात बेकायदेशीर टीपूचे स्मारक हटविलेरावेर तालुक्यात वादळाने १२५२ हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त

11 तालुक्यातील भूजल पातळी समाधानकारक

विहिरींच्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील 15 तालुक्याची भूजल पातळी निश्चीत करण्यात आली आहे. त्यात भुसावळ -0.81, बोदवड -0.01, यावल -0.43 आणि जामनेर -0.16 मिटर अशा चार तालुक्यात पाण्याच्या पातळीत घट आहे. तर इतर मुक्ताईनगर 0.13, रावेर 0.28, जळगाव 0.58, धरणगाव 0.91, एरंडोल 0.97, चोपडा 0.69, अमळनेर 0.73, पारोळा 0.35, पाचोरा 0.85, भडगाव 0.65, चाळीसगाव 0.45 अशी वाढ राहिली आहे. वाढ झालेल्या निरीक्षण विहिरींची संख्या 144 असून 34 निरीक्षण विहिरींमध्ये घट दर्शविण्यात आली आहे.

बहिणीच्या आत्महत्येमुळेच फकीराचा काढला काटाधुळ्यात मनाई आदेश जारी ; पोलीस बंदोबस्त तैनात

गिरणा धरणातील पाणीसाठा 24 टक्क्यांवर

वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाणीसाठा देखिल कमी झाला असून गिरणा धरणात सद्यस्थितीला 23.57 टक्के पाणीसाठा आहे. तर वाघुर 62.90, हतनूर 42.90, सुकी 61.16, अभोरा 58.98, मंगरूळ 43.06, मोर 64.20, अग्नावतील 00, हिवरा 8.16, बहुळा 20.54, तोंडापूर 34.63, अंजनी 20.41, गुळ 63.83, भोकरबारी 0.22, बोरी 00, मन्याड 11.22 असा एकूण 36.79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाइची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना दूरच्या विहीरींवरून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हळदीच्या कार्यक्रमातील वादात तरुणावर वार ; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

जिल्ह्यातील 178 विहीरींचे निरीक्षण

भूजल पातळीची नोंद घेण्यासाठी जिल्ह्यातील 178 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यात मुक्ताईनगर तालुक्यातील 11, रावेर 10, भुसावळ 7, बोदवड 6, यावल 7, जामनेर 24, जळगाव 15, धरणगाव7, एरंडोल 4, चोपडा 14, अमळनेर 14, पारोळा 16, पाचोरा 14, भडगाव 8 आणि चाळीसगाव तालुक्यातील 21 अशा एकूण 178 विहिरींचे निरीक्षण करण्यात आल्यानंतर भूजल पातळी निश्चीत करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या