Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामनपाच्या अ‍ॅपवरील तक्रारी परस्पर निकाली

मनपाच्या अ‍ॅपवरील तक्रारी परस्पर निकाली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नागरिकांच्या तक्रारींचे (Complaints) परिणामकारक निवारण करण्यासाठी महापालिकेने एनएमसी ई-कनेक्ट अ‍ॅप (NMC E-Connect App) विकसित केले आहे. मात्र या अ‍ॅपवर नागरिकांनी केलेल्या तक्रारीची मनपावर प्रशासकीय राजवट असल्याने दखल घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे.

- Advertisement -

या तक्रारी परस्पर निकाली काढल्या जात असल्याचे दिसून येत आहे. मनपाच्या ऑन लाईन तक्रारींची (Online complaints) दखल कुद्द मनपा आयुक्त (Municipal Commissioner) घेत असल्याने त्याबाबत सुरुवातीच्या काळात कमालीची जागरुकता दिसून येत होती. ऑन लाईन तक्रारीचा अहवाल आयुक्तांना सादर करावा लागत होता.

मात्र मध्यंतरी या प्रक्रिया शिथील झाल्याने अधिकारी व कर्मचारी देखिल तक्रारींकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. नागरीकांचे असरदार शस्त्र त्यामुळे बोथट झाल्याचे चित्र आहे. ऑन लाईन तक्रारीवर कारवाई होत नसल्याने अधिकारी त्याकडे दूर्लक्ष करुन केवळ सोपास्कार पार पाडल्याचे दिसून येत आहे.

वर्क इज डन’चे मेसेज

महापालिकेच्या अ‍ॅपवर तक्रार केल्यानंतर काही नागरिकांना महापालिकेच्या कर्मचार्‍यांचे तक्रार अर्जावर सहीसाठी फोन येतात. कामे झालेली नसताना ही अनेक कर्मचार्‍यांकडून तक्रारदारांच्या सह्या घेत ’वर्क इज डन’ असे टाकून अ‍ॅपवरील तक्रार बंद करतात. यासंदर्भात काही नागरिकांकडून महापालिकेत तक्रारी देखील करण्यात आलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या