शिवजयंतीनिमित्त मान्यवरांचे शिवरायांना अभिवादन

शिवजयंतीनिमित्त मान्यवरांचे शिवरायांना अभिवादन

मुंबई | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी आज (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्याबरोबरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत म्हटले की, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत महाराजाधिराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी म्हटले की, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना साष्टांग नमस्कार. असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्वीट करत म्हटले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! मानाचा मुजरा! महाराजांच्या विचारांची कास धरून जनतेच्या सेवेत आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने सदैव तत्पर आहोत. त्यांच्या स्मृतींना त्रिवार वंदन असे म्हटले आहे.

दरम्यान, अभिवादन सोहळ्यानंतर राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी क्रीडा भवन येथे महानगरपालिकेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर राष्ट्रगीतासोबत 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गायले गेले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com