Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याआपत्कालीन सेवा केंद्र प्रकल्पाला हिरवा कंदिल

आपत्कालीन सेवा केंद्र प्रकल्पाला हिरवा कंदिल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (Nashik Municipal Smart City Development Corporation) संचालक मंडळाची 23 वी सभा नुकतीच ऑनलाइन पद्धतीने झाली. अध्यक्ष तथा राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेस ( NMC )उपयुक्त ठरणार्‍या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर प्रकल्पाची निविदा काढण्यास स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईच्या धर्तीवर नाशिक महापालिकेला हायटेक इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर मिळणार आहे. त्याचबरोबर जलशुद्धीकरण केंद्र, स्काडा आणि वॉटर मीटरसंबंधीच्या निविदांचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. बैठकीत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्या संचालक म्हणून नियुक्तीस व 2021-22 या आर्थिक वर्षातील वित्तीय विवरण पत्रास मान्यता देण्यात आली. यावेळी भूमिगत जलवाहिनी, विद्युत वाहिनींचे जीआयएस मॅपिंग, जलशुद्धीकरण केंद्र, स्काडा व वॉटर मीटरसंबंधीच्या निविदा आणि एजन्सी नियुक्ती बाबत अवगत करण्यात आले.

अहिल्याबाई होळकर पुला संदर्भात स्मार्ट ब्रीज प्रणाली बसविण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच कुंभमेळ्याच्या अनुषंगाने इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर या प्रकल्पाच्या निविदेस मान्यता देण्यात आली. स्मार्ट सिटी कंपनीची निविदा काढण्याची मुदत 31 मार्च रोजी संपली. मात्र, तत्कालीन आयुक्तांनी मुदत वाढवून देण्यासाठी शासनाला विनंती केली होती.

त्यामुळे शासनाने आयटी बेस प्रकल्पांच्या निविदा काढण्यास मुदतवाढ दिली होती. त्यानुसार इ-स्कूल आणि इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकिस जिल्हाधिकारी गंगाथरण डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, भास्कर मुंढे, तुषार पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे आदींसह विभाग प्रमुख उपस्थितीत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या