अंजनेरी ते ब्रम्हगिरी रोप-वेसाठी हिरवा कंदील; लवकरच सर्वेक्षण- खा. हेमंत गोडसे

अंजनेरी ते ब्रम्हगिरी रोप-वेसाठी हिरवा कंदील;  लवकरच सर्वेक्षण- खा. हेमंत गोडसे
USER

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

देश-विदेशात प्रसिध्द व बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या आणि दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरणार्‍या त्र्यंबकेश्वरTrimbakeshwar येथे भाविक आणि पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. रोजगार निर्मिती, व्यवसाय वृध्दीही होणार आहे. कारण अंजनेरी-ब्रम्हगिरी दरम्यान रोप वेसाठी Anjaneri to Bramhagiri ropeway; केंद्राने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्याकरीता सल्लागार संस्था नियुक्त केली जाणार असून टेंडरची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे MP. Hemant Godse यांनी दिली.

त्र्यंबकनगरीत दररोज हजारो भाविक येतात. परिसरातील अंजनेरी आणि ब्रम्हगिरी या धार्मिक पर्वतांचेही मोठे महत्व असल्याने अनेक भाविक तेथे जातात. तथापी, घनदाट जंगलात असलेल्या उंचावर असलेल्या या ठिकाणी जाणे शक्य नसल्याने अंजनेरी-ब्रम्हागिरी दरम्यान रोपवे तयार करावे यासाठी खासदार गोडसे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. रोपवे प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तसेच सर्वेक्षणासाठी सल्लागार संस्था (कन्स्लटंट एजन्सी) Consulting body for the survey नेमण्याबाबत शासनाने आदेश काढले आहेत.

या निर्णयामुळे आता अंजनेरी - ब्रम्हगिरी यादरम्यानच्या रोपवेचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरच तयार होणार असून येत्या काही वर्षात या ठिकाणच्या पर्यटनास मोठी चालना मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. त्र्यंबकेश्वर बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असून दर बारा वर्षांनी याठिकाणी कुंभमेळा भरतो. परिसरात कुशावर्त आणि संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर असून नारायण नागबली हा विधी देशभरात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच होत असल्याने देशभरातून भाविक पुजेसाठी येतात.

परिसरात अंजनेरी आणि ब्रम्हगिरी ही ऐतिहासिक स्थळे असून संपूर्ण परिसर हा घनदाट जंगलाचा व निसर्ग रम्या आहे. अंजनेरी आणि ब्रम्हगिरी पर्वतांचे धार्मिक महत्व असले तरी या पर्वतांवर जाण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने भाविक या पर्वतांवर जात नाहीत. रोपवे झाल्यास पर्यटक तसेच भाविक अंजनेरी आणि ब्रम्हगिरी या पवित्र स्थळांना भेट देवू शकतात. या विचारातून या ठिकाणी रोपवे उभारण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून खा. गोडसे यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत.

या मागणीचा विचार करून केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टीक मॅनेजमेंट या कंपनीने अंजनेरी-ब्रम्हगिरी रोपवेच्या प्रस्तावास हिरवा कंदिल दाखविला आहे. रोपवे प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी सरकारने कंन्स्लटंट एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांकडून निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रक्रिया पार पडताच रोपवेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे.

अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान तर भगवान शंकराने जटा आपटल्याने ब्रम्हगिरी हे गोदावरी मातेचे उगमस्थान झाले आहे. दोन्ही उंच पर्वतांवर जाण्यासाठी सुविधा नसल्याने ही ऐतिहासिक ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहेत. रोपवे झाल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

खा. हेमंत गोडसे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com