Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo: 'देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो'ला शानदार सुरुवात

Video: ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’ला शानदार सुरुवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ ‘ ( Deshdoot Property Expo-2022 ) प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

- Advertisement -

पंचवटी( Panchavati ) येथील एस. एल. के. प्रॉपर्टीज, राज स्वीट्स समोर, आरटीओ कॉर्नर, दिंडोरी रोड येथे २५ ते २७ फेब्रुवारी या तीन दिवसांत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि तत्सम असे ३० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. खासदार हेमंत गोडसे ( MP. Hemant Godse ) यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एचडीएफसीचे उत्तर महाराष्ट्र व्यवसाय प्रमुख तथा मराठवाडा प्रादेशिक प्रमुख संदीप कुलकर्णी, नगरसेवक अरुण पवार व जगदीश पाटील आणि प्रसिद्ध उद्योगपती आशिष कुकरेजा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रारंभी ‘देशदूत’चे मार्केटिंग महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गोडसे व कुलकर्णी यांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणाऱ्या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले.

प्रदर्शनाचे प्रायोजकत्व एचडीएफसी हाऊसिंग ( HDFC Housing ) यांनी स्वीकारले आहे. प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले असून तीन दिवस शासन नियमांचे पालन केले जाणार आहे. गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट द्यावी, देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. संजय लोळगे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. देशदूतचे वरिष्ठ पत्रकार रवींद्र केडीया यांनी आभार मानले.

लकी ड्रॉ चे विजेते Winners of the lucky draw

तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी ६ भाग्यवान विजेत्यांनी बक्षिसांची लयलूट केली. यात छाया मोरे, अमोल कुमावत, निलेश बोरसे यांना टकले ज्वेलर्स यांच्यातर्फे १० ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे तर अजित कुलकर्णी, सुरेश पगार, बापूराव उगले यांना सोनी पैठणीतर्फे पैठणी मिळणार आहे. विजेत्यांनी एक्सपोला भेट देऊन आपापली बक्षिसे घेऊन जावी येताना सोबत ओळखपत्र आणणे आवश्यक आहे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये योग्य समन्वय साधला जाणार आहे. देशदूत ने आयोजित केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यायला हवा.

संदीप कुलकर्णी

अनेक बांधकाम व्यावसायिकांना व्यासपीठ मिळाले असून येथील नागरिकांना देखील याचा नक्कीच फायदा होणार आहे. बांधकाम क्षेत्रासाठी नाशिकला सोन्याचे दिवस येणार आहे. देशदूतच्या माध्यमातून होणारा हा उपक्रम प्रशंसनीय असा आहे.

खा.हेमंत गोडसे

- Advertisment -

ताज्या बातम्या