Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशभारतात गुंतवणूकीची मोठी संधी - पंतप्रधान मोदी

भारतात गुंतवणूकीची मोठी संधी – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली |New Delhi – आशियातील आघाडीची तिसरी मोठी भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक खुली अर्थव्यवस्था आहे. ही अर्थव्यवस्था व्यवसायांसाठी अत्यंत पूरक आणि स्पर्धात्मक वातावरण प्रदान करते. जगभरातील व्यावसायिकांना येथे मोठ्या प्रमाणात संधी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले केले. ते गुरुवारी इंडिया ग्लोबल वीक-2020 मध्ये बोलत होते.

करोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमधून भारत आता बाहेर पडत आहे. अर्थव्यवस्था आता रुळावर येण्याचे संकेत दिसत आहेत. जगातील सर्वाधिक खुल्या अर्थव्यवस्थांपैकी भारतीय अर्थव्यवस्था एक आहे. जागतिक कंपन्यांसाठी आम्ही लाल गालिचा अंथरत आहोत. त्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा. भारत देत असलेल्या संधी जगातील निवडक देशच उपलब्ध करतात, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

अधिक उत्पादक, गुंतवणूक पूरक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्था आम्ही उभारत आहोत. भारतातील विविध उगवत्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आणि संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे साठवणूक आणि वाहतूक सेवेत गुंतवणुकीच्या आकर्षक संधी निर्माण झाल्या आहेत. गुंतवणूकदारांसाठी आम्ही दरवाजे उघडे केले असून, येथे थेट गुंतवणूक करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी जागतिक गुंतवणूकदारांना केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या