Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात कृषी पर्यटनाला मोठी संधी

जिल्ह्यात कृषी पर्यटनाला मोठी संधी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात कृषी पर्यटनाला ( agri-tourism) मोठी संधी असून कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी याचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी,असे आवाहन करत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.)यांनी शासनाच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवाव्यात,असे आवाहन केले.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक जयंती निमित्त जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, शासन कृषि विभाग,आत्मा व नाशिक पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृहात कृषी दिन (Agriculture Day)कार्यक्रम साजरा करण्यात आला.त्यावेळी अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी गंगाथरन बोलत होते.यावेळी आत्मा अंतर्गत निवडण्यात आलेले 19 आदर्श शेतकरी व 02 उत्कृष्ट शेतकरी गट 2021-22 यांना पुरस्कार देण्यात आला.

व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, विभागिय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे,आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, कृषी उपसंचालक प्रिती हिराळकर प्रमुख पाहुणे म्हणपन उपस्थित होते.

गंगाथरन म्हणाले,कृषीच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी विभागाने अन्य विभागांशी संवाद साधावा. कृषी संजिवनी तसेच पिक विमा सप्ताहात शासनाच्या योजना अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवून प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावे. जिल्हयात पावसाचे आगमन झाले असून शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण कृषि निविष्ठा मिळण्यासाठी कृषी विभागाने सतर्क रहावे. तसेच बोगस व भेसळयुक्त निविष्ठा विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.

बनसोड म्हणाल्या, शेतकर्‍याचा कृषी माल तत्काळ बाजारपेठेत पोहोचण्याबरोबरच चांगली किंमत मिळवायची असेल तर शेतापर्यंत रस्ते सुस्थितीत असले पाहिजे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून पाणंद रस्ते तयार केले जात आहेत. कृषी पर्यटनासाठी शेतकर्‍यानी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. बांधावर फळबाग किंवा वृक्ष लागवड योजनेसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन केले.तसेच कृषि पर्यटनाच्या माध्यमातून शेती उत्पादने थेट ग्राहकापर्यंत विक्री करण्याची गरज व्यक्त केली.

इफको कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी निमिश पवार म्हणाले, संशोधनातून आता लिक्विड स्वरुपात खत उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट, खते ठेवण्याची जागा यासंदर्भात असलेल्या समस्यांचे तत्काळ निराकरण होईल. त्याचबरोबर खत उपलब्धतेचा प्रश्न निकाली निघेल. कृषी विभागाचे तंत्र अधिकारी सीताराम चौधरी यांनी खरीप पिक विमा संदर्भात माहिती दिली. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी विश्वास बर्वे यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती देताना 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी आभार मानले.सूत्रसंचालन मोहिम अधिकारी अभिजीत जमधडे यांनी केले.

या शेतकर्‍यांचा सन्मान

पुनम डोखळे (खेडगाव, ता. दिंडोरी), महेंद्र निकम (दाभाडी, ता. मालेगाव), चंद्रकांत शेवाळे (टेहरे ता. मालेगाव), नितीन गायकर (गिरणारे, नाशिक), महेश टोपले (मोहपाडा, पेठ), सखाहरी जाधव (कृष्ण नगर ता. इगतपुरी), जगन्नाथ घोडे (घोडेवाडी, ता. इगतपुरी), शरद शिंदे (खडक माळेगाव, ता. निफाड), गणेश चव्हाण (उगाव, ता. निफा), ज्ञानेश्वर गांगुर्डे (दिघवद ता. चांदवड), बापू साळुंके (वडनेर भैरव, ता. चांदवड), रामदास ठोंबरे (पुरणगाव, ता. येवला), सागर साळुंके (देवळा, ता. येवला), गणेश पवार (कळवण खु., ता. कळवण), दौलत शिंदे (कळवण खुर्द, ता. कळवण), कैलास शिंदे (खालप, ता. देवळा), बाबुराव बोस (जानोरी, ता. दिंडोरी), दत्तू सोनवणे (पानेवाडी, ता.नांदगाव), सचिन शिलावट (नागापूर, ता. नांदगाव).

- Advertisment -

ताज्या बातम्या