Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्या'देशदूत हॉट प्रॉपर्टी'च्या पहिल्या विशेषांकाचे शानदार प्रकाशन

‘देशदूत हॉट प्रॉपर्टी’च्या पहिल्या विशेषांकाचे शानदार प्रकाशन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

घर घेण्याच्या कल्पनेपासून ते प्रत्यक्ष घराच्या व्यवहारापर्यंतचे अंतर मोठे असते. ‘देशदूत हॉट प्रॉपर्टी’च्या माध्यमातून तो प्रवास अधिक जलद व गतिमान होईल, असा विश्वास शहरातील दिग्गज बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला.

- Advertisement -

‘देशदूत हॉट प्रॉपर्टी’च्या पहिल्या विशेषांकाचे शानदार प्रकाशन आज सायंकाळी ‘देशदूत’च्या प्रांगणात नाशिक सिटीझन फोरमचे अध्यक्ष आशिष कटारिया, देशदूत समूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, क्रेडाई नाशिकचे गौरव ठक्कर, रामबंधूचे संचालक हेमंत राठी, बांधकाम व्यावसायिक सुनील भायभंग यांच्या हस्ते झाले.

यावेळी आशिष कटारिया म्हणाले की, नाशिकचा विकास झपाट्याने होत आहे. विकास करतांंना विचारपूर्वक व जबाबदारीने झाला पाहिजे. रिअल इस्टेट विकासाचा प्रभाव हा समाजावर होत असतो.त्यामुळे हा विकास करताना शहराच्या चांगल्या बाबींवर भर दिला पाहिजे. नाशिकची गुणवत्ता चांगली आहे.आपले सुंदर नाशिक विकासात्मक असले पाहिजे.

यावेळी झालेल्या वार्तालापात जितूभाई ठक्कर म्हणाले की, नाशिकचे बांधकाम व्यावसायीक म्हटले की क्वालिटी मॅन अशा प्रतिमा निर्माण करण्यात आम्हाला यश आले आहे. आता नाशिकचा विकास झपाट्याने होत आहे. मात्र घर घेण्याची इच्छा झाल्यापासून ते प्रत्यक्ष घर घेईपयर्ंंतचा प्रवास खूप मोठा असतो.ते अंतर कमी करण्यासाठी चांगल्या व्यासपीठाची गरज होती. ती ‘देशदूत’च्या हॉट प्रॉपर्टीच्या माध्यमातून निश्चित पूर्ण होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

यावेळी उपस्थित क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, नरेडकोचे सचिव सुनील गवांदे, जयप्रकाश जातेगावकर, धनंजय बागड, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक सी.पी.सिंंह आदींनी चर्चात्मक कार्यक्रमात सहभागी होऊन नाशिकच्याप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. देशदूतच्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांंंनी त्यांच्याशी संंवाद साधला.

‘देशदूत HOT प्राॅॅपर्टी’ विशेषांक (भाग-१)

यावेळी नाशिक बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. वैभव शेटे, सचिव हेमंंत गायकवाड, बांधकाम व्यावसायीक नरेंद्र कुलकर्णी, अजिंक्य बागड, निर्माण ग्रुपचे हितेश पोद्दार, प्रमोद मुरकेवार, आदित्य डेव्हलपर्सचे अनंत ठाकरे, प्लंंम्बिंग असोसिएशनचेे अध्यक्ष रवी पाटील, सुधीर देवरे, नावाचे अध्यक्ष प्रवीण चांंडक, सचिन गिते, सुभाष गांंधी, अमोल कुलकर्णी, नितीन राका उपस्थित होते. ‘देशदूत’चे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी आभार मानले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या