Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याअवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक चिंतित

अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक चिंतित

ओझे/ वार्ताहर oze

दिंडोरी तालुक्यात Dindori Taluka चार दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने काल सांयकाळी तालुक्यात हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु झाल्याने द्राक्ष उत्पादक Grapes Growers शेतक-यांमध्ये Farmers चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

आरर्ली द्राक्षबागाची छाटणी झालेल्या द्राक्षबागामध्ये सध्या पाणी उतरले असल्यामुळे या द्राक्षबागाना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तालुक्यात १५ जानेवारी नंतर बऱ्याच ठिकाणी द्राक्ष हंगाम चालू होणार असल्याने जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.सकाळी धुके, सांयकाळी थंडी यांमुळे शेतकरी हैराण झाले आहे.

द्राक्षमण्यामध्ये साखरेचे प्रमाण वाढत असताना अवकाळी पाऊस unseasonal rains झाल्यास द्राक्ष मण्यास तडे जाण्याचा मोठा धोका असतो त्याप्रमाणे गहू, हरबरा, कादां पिकासह सर्वच पिकानां हा पाऊस हानीकारक आहे सतत बदलणा- यां वातावरणाचा शेती व्यवसाला मोठा फटका प्रत्येक वर्षी बसत असल्यामुळे निसर्गापुढे शेतकरी हतबल झाल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.

अगोदर द्राक्षे हंगामासाठी पोषक वातावरण उत्तम होते.परंतु दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असुन सर्वत्र ढगाळ वातावरण दिसत असुन सकाळपासून हलक्या स्वरुपाच्या पावसांच्या सरी पडल्यामुळे द्राक्षे पंढरी हादरली आहे. या वातावरणाचा द्राक्षे पिकांवर लवकर परिणाम होत असल्याने बळीराजांला द्राक्षे बागा वाचवण्यासाठी पावडर फवारणी ची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजांवर पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सामोरे जाण्याची चित्र निर्माण झाले आहे.

सध्या जवळ जवळ ५०ते ६० टक्के द्राक्षे बागा साखर प्रमाणात आहे. व काही बागा मध्यम स्थितीमध्ये आहे. म्हणजे तालुक्यातील जवळ जवळ सर्वच द्राक्षे बागा या पुर्ण अवस्थेत असल्याने त्या वाचवण्यासाठी शेतकरी वर्गाची महागड्या किंमतीच्या पावडरी खरेदीवर भर दिली आहे. अगोदरच सुरुवातीला प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च करून द्राक्षे बागा वाचविल्या .व द्राक्षे बागा आता जोमात असतांना अचानक वातावरणातील बदल झाल्याने द्राक्षे पंढरीतील द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्ग हादरला आहे.

मागील हंगामात अत्यंत कटु अनुभव अनुवलेल्या बळीराजां अगोदरच भांडवल मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्याने बेजार झाला असतांना ,पुन्हा एकदा वातावरणात अचानक बदल झाल्याने बळीराजांवर आर्थिक संकटांची कु-हाड कोसळली आहे. त्यामुळे मागील वर्षी ची पुनरावृत्ती होऊ नये अशी भीती तालुक्यातील शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या