Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून द्राक्ष लिलाव

आजपासून द्राक्ष लिलाव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत Nashik APMC शनिवार (दि.15) पासून द्राक्षांचे लिलाव Grapes Auctions सुरू होणार आहेत.

- Advertisement -

त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी आपला शेतमाल पेठ रोडवरील शरद पवार बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.

नाशिक जिल्हा द्राक्षांचे आगार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. द्राक्षाची मोठ्या प्रमाणावर शिवारातच खरेदी होते. त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक होण्याचे प्रकार अनेक वेळा घडतात.

शेतकर्‍यांच्या द्राक्षाला रास्त भाव मिळत नाही. म्हणून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी 15 जानेवारीपासून द्राक्षांचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणावा, असे आवाहन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या