Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराज्य शासनाकडून मनपाला अनुदान

राज्य शासनाकडून मनपाला अनुदान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सुमारे 2 वर्षांपासून थकीत असलेले मुद्रांक शुल्क अधिकारापोटीचे (Stamp duty authority ) 27 कोटींचे अनुदान राज्य शासनाकडून महापालिकेला ( NMC ) मिळाले आहेत. 2020-21 मधील करोना काळात 5 कोटी तर करोना उतरणीला असताना 2021-22 मधील अनुदानापोटी पालिकेला 22 कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे नाशकात करोना सरल्यानंतर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराला चांगले दिवस आले आहे.

- Advertisement -

राज्य शासन 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत त्या त्या शहरात जमिनी किंवा घरे, दुकाने खरेदी-विक्रीतून मिळणार्‍या एकूण 6 टक्के मुद्रांक शुल्कातून महापालिकेला एक टक्का रक्कम अनुदान म्हणून परत केली जाते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून करोनाची (Corona )पहिली लाट आणि त्या पाठोपाठ आलेल्या दुसर्‍या लाटेमुळे लादलेल्या निर्बंधांचा मोठा फटका राज्यातील खरेदी व विक्रीच्या व्यवहारांना बसला.

निर्बंध हटल्यानंतर आता व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. करोनाकाळात शासनाने मुद्रांक शुल्कात 50 टक्के सवलत देऊ केली होती. त्याचाही सकारात्मक परिणाम खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर झाल्याचे चित्र आहे. 2020-21 या आर्थिक वर्षांत झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराचे 5 कोटी तर 2021-22 या आर्थिक वर्षात झालेल्या व्यवहारापोटी 22 कोटी असे एकूण 27 कोटींचे एक टक्का मुद्रांक शुल्कापोटीचे अनुदान शासनाने महापालिकेला वितरीत केले आहे. त्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या