नातू ठरला आजीचा कर्दन काळ; हरसूलची घटना

नातू ठरला आजीचा कर्दन काळ; हरसूलची घटना

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

बालपणी जन्मदात्या आईपेक्षा आजीलाच (grandmother) नातवांची (grandson) खूप काळजी आणि जबाबदारी सांभाळावी लागते. परंतु रक्तातल्या नात्याला हल्ली काळिमा फासला जात आहे.

रक्तानेच सांभाळणाऱ्या आजीच्याच कुरवणाऱ्या कुशीवर घाव घातल्याने आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला नातू अजीचा कर्दन काळ ठरला ही घटना हरसूल (harsul) येथे घडली आहे. गंगुबाई रामा गुरव असे मयत झालेल्या आजीबाईचे नाव आहे.

या घटनेने हरसूल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हरसूल पोलीस स्टेशनचे (Harsul Police Station) सहायक पोलीस उपनिरीक्षक जनार्दन झिरवाळ (Assistant Sub-Inspector of Police Janardhan Jirwal) यांनी दिलेल्या माहितीनुसार हरसूल शहरातील इंदिरा नगर येथे आज मंगळवार (दि.23) रोजी सकाळी 6.00 वाजेच्या दरम्यान घटना घडली असल्याचे समजले.

कुटुंबातील गंगुबाई रामा गुरव (वय 70) या आजीबाईच्या उजव्या डोळ्याजवळ नातू दशरथ किसन गुरव (वय २२) याने हातातील घातलेल्या कड्याच्या सहाय्याने वार केले आहेत. यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच हरसूल ग्रामीण रुग्णालयात (Harsul Rural Hospital) शव विच्छेदन (Carcass dissection) करण्यासाठी दाखल करण्यात आले. मात्र नातवानेचे लहानपणी कुरवणाऱ्या आजीचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या अगोदर ही हरसूल भागात अशीच घटना घडली होती.

मात्र दुपार पर्यन्त हरसूल पोलीस स्टेशनला (Harsul Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे (Sub Divisional Police Officer Kavita Phadtare) यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक झिरवाळ, पोलीस कर्मचारी जाधव अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com