Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रग्रामपंचायत : कोणत्या नेत्याला यश, कोणाला धक्का, पाहा महत्वाचे निकाल एका किल्कवर

ग्रामपंचायत : कोणत्या नेत्याला यश, कोणाला धक्का, पाहा महत्वाचे निकाल एका किल्कवर

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी होत आहे. राज्यातील सत्तेची समीकरण बदलल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाहा राज्यातील निकालाचे क्षणक्षणाचे अपडेट्स….

अनिल देशमुख यांचे वर्चस्व सिद्ध

काटोल मतदार संघात काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने एकहाती विजय मिळविल्यामुळे काटोल मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापीत झाले आहे. काटोल तालुक्यातील तिनही ग्रामपंचायतीवर तर नरखेड तालुक्यातील १७ पैकी १६ ग्रामपंचायतीवर अनिल देशमुख गटाने विजय मिळविला आहे. काटोल तालुक्यातील भोरगड मध्ये ९ पैकी ९ ही उमेदवार, खंडाळा ग्रामपंचायत मध्ये ७ पैकी ७ ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर चेनकापूर-माळेगाव मध्ये ९ पैकी आठ जागांवर राष्ट्रवादी व शेकापचे उमेदवार विजयी झाले आहे.

- Advertisement -

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अकलूजमध्ये भाजपच

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेली अकलूज ग्रामपंचायत परत एकदा भाजपने काबीज केली आहे. भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाने 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायतीत 16 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला. तर, एकजागा बिनविरोध झाली आहे. अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा संघटनेते नेते धवलसिंह मोहिते पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी थेट लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत 17 जागांपैकी 14 जागा भाजप विजयसिंह मोहिते-पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर 3 जागांवर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला मिळाल्या आहेत.

आमदार विखे यांना धक्का

माजी विरोधी पक्षनेते व भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जबर धक्का बसला आहे.राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली असून लोणी खुर्द मध्ये सत्तांतर झाले आहे. लोणी खुर्द मधील जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलचा १७ पैकी १३ जागा जिंकत विजय झाला आहे.

हिवरेबाजारात पोपटराव पवारच

तीस वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या आदर्शगाव हिवरेबाजार इथं पोपटराव पवार यांच्या आदर्श गाव पॅनलचा विजय झालाय. सातच्या सात जागांवर आदर्श गाव पॅनलचे उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे हिवरे बाजार ग्रामपंचायतीवर पोपटराव पवार यांची सत्ता अबाधित राहिली आहे.

नितेश राणे यांना धक्का

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनाळी गावात ७ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. ७ पैकी पाचही जागांवर शिवसेनेने जिंकल्या आहे. सोनाळी गावात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. नितेश राणे यांना हा धक्का मानला जात आहे.

राम शिंदे यांना धक्का

माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या चौंडी गावात भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादीला सहा जागा मिळाल्या तर अरणगाव भाजपला धक्का तर नान्नजमध्ये 13 पैकी भाजपचे 7 जागा मिळाल्या असून जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 तर भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत.

रावसाहेब दानवेंना धक्का

जालना ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला असून भोकरदन तालुक्यात भाजपला जोरदार हादरा बसलाय. भाजपच्या ताब्यात असलेली रेणुकाई पिंपळगाव ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीला विजय मिळालाय. या ठिकाणच्या 13 पैकी 12 जागेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजय मिळवलाय.

जयंत पाटील यांना धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. म्हैसाळ ही जयंत पाटील यांची सासुरवाडी आहे. 17 जागांच्या या ग्रामपंचायतीत जयंत पाटील यांचे पाहुणे राऊळे उभे होते. मात्र भाजपने इथे मोठा विजय मिळवला. जयंत पाटील यांची सासरवाडी असलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपचा एकतर्फी विजय झाला.म्हैसाळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपाला तब्बल 15 तर राष्ट्रवादीला फक्त 2 जागांवर विजय मिळाला.

बीडमध्ये धनंजय मुंडे यांना दिलासा

बीड जिल्ह्यातील परळीतून राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. तालुक्यातील एकूण 7 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. त्यापैकी 6 ठिकाणी पंकजा मुंडे आणि भाजपच्या गटाला धक्का देत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

आशिष शेलार यांनी सासुरवाडीची ग्रामपंचायत राखली

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात भाजपला यश आहे दांडेली या गावात भाजपचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांची सासूरवाडी असून दांडेली ग्रामपंचायत बरीच वर्षे शिवसेने कडे होती मात्र यावेळी ती ग्रामपंचायत भाजप कडे आली आहे.भाजप नेते आशिष शेलार स्वता या ठिकाणी प्रचारासाठी आले होते.त्यामुळेच या ग्रामपंचायत वर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

शिवसेनेच्या दीपक केसरकर यांना भाजपचा दे धक्का

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी कोलगाव ग्रामपंचायत भाजपने शिवसेनेकडून हिसकावून घेत माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांना जोरदार धक्का दिला आहे. जिल्ह्य़ातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कोलगाव कडे पाहिले जात होते.भाजप चे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी एकहाती वर्चस्व राखले आहे.

भास्कर पेटे पाटील यांना धक्का : मुलीचा पराभव

सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्यामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पाटोदा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीतून भास्कर पेरे पाटील यांनी माघार घेतली होती, तर त्यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. मात्र पेरे पाटील यांच्या मुलीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. पाटोद्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श सरपंच अशी ओळख असलेल्या भास्कर पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव झाल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

राळेगणसिद्धीत अण्णांचेच वर्चस्व

राळेगणसिद्धीत हजारे यांचे निकटवर्तीय, माजी स्वीय सहायक अशा मंडळींनी एकत्र येत स्थापन केलेल्या ग्रामविकास पॅनलला सर्वच्या सर्व नऊ जागा मिळाल्या आहेत. विरोधकांनी उभ्या केलेल्या शामबाबा पॅनलचा सपशेल पराभव झाला. माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, अनिल मापारी, लाभेष औटी, उद्योजक सुरेश पठारे यांच्या पॅनलने सत्ता राखली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या