टिळकनगर (वार्ताहर)
तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला असून यात ससाणे गटाने बाजी मारली असून स्पष्ट बहुमत मिळवून विखे गटाला पराभूत केले आहे. दत्तनगर ग्रामपंचायतिच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूकित स्वर्गीय जयंत ससाणे गटाच्या ग्रामविकास आघाडीला सरपंच पदासह 9 सद्यस्य विजय झाले आहे तर विखे गटाच्या कृषि उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे यांच्या नेर्तृत्वाखाली 7 जागा तर वंचित बहुजन आघाडीने एका जागेवर आपला झेंडा फडकविला. माजी लोकनियुक्त सरपंच सुनिल शिरसाठ यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे लागले. सुरुवातीपासून तिन्ही गटाने प्रचारांत शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी घेतली मात्र आज जनतेने ससाणे गटाच्या बाजूने कौल दिल्याने गावाचा कारभार एकहाती दिल्याचे दिसून येत आहे.
सरपंच पदासाठी प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
सारिका कुंकलोळ- 2311 (विजयी)
रोजलीन निकम-1444
योगिता क्षीरसागर-210
सद्यस्य पदासाठी विजयी झालेले उमेदवार-
प्रभाग क्र-1- संजय बोरगे, शालिनी मगर,
प्रभाग- 2)- राजेंद्र मगर, राणी खाजेकर, शाकेरा बागवान
प्रभाग-3)- सागर भोसले, सुनील शिंदे, प्रीती ब्राह्मणे
प्रभाग-4-लक्ष्मण कडवे, प्रेमचंद कुंकलोळ, नयना शेवाळे,
प्रभाग 5- पोपट पठारे, भारती आव्हाड, सूनयना शिवलकर,
प्रभाग 6- विशाल पठारे, राजश्री खंडागळे, कुसुम बाई जगताप
लक्षवेधी लढतीत यांनी मारली बाजी-
1)-प्रभाग क्रं-3-मधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे यांचा सामना ससाणे गटांकडून हिरामण जाधव यांच्याशी होता त्यात शिंदे विजयी झाले.
2)-प्रभाग क्रं-3 मध्ये माजी लोकनियुक्त सरपंच सुनील शिरसाठ यांची लढत विखे गटातील सागर भोसले यांच्याशी होती सागर भोसले यांनी शिरसाठ यांना परभावाचा धक्का दिला.
3)-प्रभाग 1 मध्ये भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांची पत्नी शालिनी मगर यांची लढत स्व. जयंतराव ससाणे यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब विघे यांच्या पत्नी आम्रपाली विघेशी होती त्यात विघे पराभूत झाल्या.
4)- प्रभाग 6 मधून आर. पी. आयचे भीमा बागुल यांची लढत ससाणे गटाच्या अरुण वाघमारे सह वंचित उमेदवाराशी होती त्यात वंचितचा उमेदवार विजयी झाला.
5)-प्रभाग क्रं 3 मधून सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांची मातोश्री सोनुबाई लोंढेची लढत विखे गटाच्या प्रीती ब्राह्मणेशी होती त्यात ब्राह्मणे यांनी बाजी मारली आहे.