Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानिवडणूक खर्च सादर करा या अँपवर

निवडणूक खर्च सादर करा या अँपवर

मुंबई / प्रतिनिधी

निवडणुकीचा खर्च अँपने दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे. निकालानंतर ३० दिवसांत हा खर्च दाखल करावा लागणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली.

- Advertisement -

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसाच्या आत एकूण खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत आणि पद्धतीने खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात येते.

निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर अँपने खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा ऐच्छिक स्वरूपाची आहे; परंतु याद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने विहित मुदतीत खर्च सादर करणे बंधनकारक आहे, असे मदान यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या