Gram Panchayat Election Result : गावकारभारी कोण? ग्रामपंचायत निवडणूक निकालांची मतमोजणी सुरू.. वाचा Updates!

Gram Panchayat Election Result : गावकारभारी कोण? ग्रामपंचायत निवडणूक निकालांची मतमोजणी सुरू.. वाचा Updates!

पारनेर भोंद्रे सरपंच पदाचे विजयी उमेदवार गणेश झावरे 57मतांनी विजयी

 पारनेर पिंपळगावतुर्क सरपंच पदाचे विजयी उमेदवार सुलोचना सावकार शिंदे 47मतांनी विजयी

पारनेर पाडळी तर्फे कान्हूर सरपंच पदाचे विजयी उमेदवार इंदुबाई शंकर सिनारे 112मतांनी विजयी

साकुरीत दीपक रोहम यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाचा सरपंच पदाच्या मेघना संदीप दंडवते विजयी. 11सदस्य विजयी, जयराज दंडवते गटाचे तीन सदस्य विजय. विरोधी जनसेवा ग्रामविकासला 3 जागा मिळाल्या.

देवळा तालुक्यातील वासोळा येथील सदस्य भारत आहिरे विजयी.

येवला तालुक्यातील कोटमगाव सरपंचपदी स्वराज्य संघटनेचे राजेंद्र काकळीज विजयी.

इगतपुरी तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. मुंढेगाव सरपंच पदी ठाकरे गटाच्या मंगला चंद्रकांत गतीर तर वासाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादीच्या सुनीता काशिनाथ कोरडे या विजयी झाल्या आहेत. वासाळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 च्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवार प्रतिभा कचरे आणि मोनिका भालेराव यांना 239 मते पडली. तर यावेळी चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. कस्तुरी वैभव बोरकर या विद्यार्थिनीने चिठ्ठी काढली असता मोनिका भालेराव या विजयी झाल्या.

मालेगाव तालुक्यातील पहिला निकाल हाती येत आला असून शिंदे गटाचे मंत्री दादा भूसेंच्या मालेगावमध्ये भाजपने खाते उघडले आहे. चौकट पाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपचे समाधान पवार विजयी झाले आहेत. 

श्रीरामपूर : १) वांगी बुद्रुक - सरपंच व सर्व ०७ सदस्य ससाणे+मुरकुटे गटाचे ताब्यात... २) खंडाळा - सरपंचपद कांबळे+विखे + कानडे सदस्य ०८ सदस्य कांबळे +विखे+ कानडे गट ०७ सदस्य - मुरकुटे+ससाणे गट....  ३) उंबरगाव - सरपंच - विराज भोसले गट ०३ - सदस्य विराज भोसले गट ०६ - सदस्य मुरकुटे + ससाणे गट....  ४) माळेवाडी - सरपंच - ससाणे+ आदिक गट ०८ सदस्य ससाणे +आदिक गट ०१ सदस्य मुरकुटे गट

चांदवड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींपैकी 22 निकाल हाती. भाजप - 11, ठाकरे गट - 1, शिंदे गट – ००, राष्ट्रवादी - 4 कॉग्रेस - 3, महाविकास आघाडी - 1, ईतर - 2 असे निकाल आहेत. वीस पैकी दहा ग्रामपंचायतीवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप आमदार राहुल आहेर यांचे वर्चस्व कायम आहे. आडगाव - लताबाई घुले - भाजप,  शेलू - अमोल जाधव - भाजप, पाटे कोलटेक - रंगनाथ सूर्यवंशी - महाविकास आघाडी, निंबाळे - रविना विष्णू सोनवणे - भाजप, चिचोले - पवन साहेबराव जाधव - भाजप विजयी

कळवण तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीमध्ये आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदाच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला दिसून येत आहे.

निफाड तालुक्यातील दिक्षी गावाच्या सरपंचपदी डॉक्टर योगेश्वर चौधरी विजयी

कसबे सुकेने थेट सरपंच पदाच्या लढतीत आनंदा गोपळा भंडारे 400 मतांनी विजयी

जामखेड तालुक्यातील तीन ग्रांमपंचायतीचे निकल जाहिर झाले असुन त्यामध्ये दोन ग्रांमपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या तर एका ग्रामपंचयतीवर भाजपाला यश मिळाले . १) रत्नापुर ग्रामपंचायत - राष्ट्रवादी २ ) राजुरी ग्रामपंचायत - राष्ट्रवादी ३ ) शिऊर ग्रामपंचायत - भाजपा

सावळी विहीर बुद्रुक ग्रामपंचायत : सावळी विहीर बुद्रुक ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी विखे पाटील गटाच्या सत्ताधारी जनसेवा विकास मंडळाचे ओमेश जपे उमेदवार विजयी झाले आहेत. सदस्य पदाच्या 15 जागांवर याच गटाचे वर्चस्व आहे. विरोधी अशोक आगलावे यांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही.

रांजणखोल ग्रामपंचायत : विखे पाटील व मुरकुटे गटाच्या सरपंच पदी शुभांगी बाबासाहेब ढोकचौळे या विजयी झाल्या आहेत. 13 पैकी 3 उमेदवार आगोदरच बिनविरोध झाले दहा जागेसाठी आता मतदान झालेहोते. त्या मतदानामध्ये सरपंच पदासह 9 जागा विखे मुरकुटे गटाला मिळाल्या आहेत. तर एका अपक्ष उमेदवाराला लॉटरी लागली आहे. भैय्या पांडे हे विजयी झाले आहेत.

पारनेर : पळशी सरपंच पदाचे विजयी उमेदवार प्रकाश बबन राठोड 231 मतांनी विजयी

पाथर्डी कोल्हार - बाळासाहेब मोहनराव पालवे गटाचा कोल्हार मध्ये विजय.सरपंच पदी राजू बन्सी नेटके विजयी

पाथर्डी कोल्हार - बाळासाहेब मोहनराव पालवे गटाचा कोल्हार मध्ये विजय.सरपंच पदी राजू बन्सी नेटके विजयी

शेवगाव - खानापूर राष्ट्रवादीचे मंगेश थोरात गटाची बाजी

पाथर्डी निवडुंगे - भाजपचे वैभव विठ्ठल देशमुख सरपंचपदी विजयी

श्रीगोंदा : तांदळी दुमाला सरपंच - निगडे संजय मारुती (विजयी)

पाथर्डी तालुका निकाल : सोनोशी - गोकुळ दौंड यांचा पॅनल सरपंचपदा सहित विजयी...  कोळसांगवी - सरपंच पदाच्या उमेदवार सुरेखा युवराज फुंदे विजयी... वडगावं - आजीनाथ विश्वनाथ बडे सरपंच पदी विजयी... मोहरी - आशाबाई पोपट वाल्हेकर सरपंचपदी विजयी,   कल्पजित डोईफोडे यांच्या पॅनलचा सरपंच पदाच्या उमेदवारासह पराभव... जिरेवाडी - मुकुंद आंधळे गटाच्या प्रहार जनशक्ती मंचच्या लक्ष्मी महादेव आंधळे सरपंच पदाच्या उमेदवार विजयी... वैजू बाभळगाव - ज्योती घोरपडे अपक्ष सरपंचपदी विजयी... तीसगावं ग्रामपंचायत व कोल्हार मोजणी चालू... 

नाशिक तालुका सरपंचपद निकाल : 1. किरण कोरडे-गिरनारे-शिंदे गट...  2. कचरू वागळे- महीरावणी- शिंदे गट...  3. मालती डहाळे-गणेशगाव-ठाकरे गट...  4. रवींद्र निंबेकर-तळेगाव-ठाकरे गट...  5. अगस्ति फडोळ-यशवंतनगर-भाजप...  6. शरद मांडे- बेलगावढगा-अपक्ष...  7. कविता जगताप-सामनगाव-ठाकरे गट...  8. पर्वता पिंपळके-देवरगाव-काँग्रेस...  9. प्रिया पेखळे-ओढा-ठाकरे गट...  10. लेखा कळाले-लाडची-अपक्ष...  11. एकनाथ बेझेकर-दुडगाव-ठाकरे गट...  12. अरुण दुशिंग-एकलहरे-भाजप...  13. सुरेश पारधे-साडगाव- राष्ट्रवादी.

श्रीगोंदा : घोगरगाव - सरपंच - सुजाता मिलिंद भोसले (विजयी)

पिंपळगाव बसवंत : सहाव्या फेरीत भास्कररावनाना 238 मतांनी आघाडीवर

निघोज ग्रामपंचायत :  सत्ताधारी जनसेवा मंडळाच्या 5 सहा सदस्य व सरपंच पद राखले! विरोधी जनसेवा विकास मंडळाला 6 जागा

आडगाव बू ग्रामपंचायत : आडगाव बू. ला सत्ताधारी बाबासाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळ गटाला सरपंच पदासह 4 सदस्यांच्या जागा मिळाल्या. तर विरोधी जय हनुमान सेवा मंडळाला सदस्यांच्या अवघ्या 3 जागा

नांदुर्खी बू. ग्रामपंचायत : नांदुर्खी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाले आहे. माधवराव चौधरी यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा ग्रामविकास मंडळाला सरपंच पदासह नऊ सदस्यांच्या जागा मिळाल्या आहेत. तर सत्ताधारी झोटिंग बाबा ग्रामविकास मंडळाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

डोऱ्हाळे ग्रामपंचायत : सत्ताधारी नवनाथ जनसेवा विकास मंडळाच्या सौ. सारिका नवनाथ आंबेडकर सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी व सहा सदस्य विजयी. विरोधी जनसेवा मंडळाला अवघ्या तीन जागा

बुलढाणा : शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव.. तीनही तालुक्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आघाडीवर

पिंपळगाव बसवंत : सतीश मोरे 233 मतांनी आघाडीवर

श्रीगोंदा : माठ - सरपंच- अरुण विश्वनाथ पवार- ३९५ मतांनी विजयी. थिटे सांगवी- सरपंच- अर्जुन रामचंद्र शेळके- ४०२ मतांनी विजयी. चवरसांगवी- सरपंच- सुनिता माळशिकारे- १७ मतांनी विजयी. तरडगव्हाण- सरपंच- कुंदा बेरड राजेंद्र - ७ मतांनी विजयी.

बारामती : सोरटेवाडी, कऱ्हाटी आणि पळशी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला

सातारा : कराड, अंतवडी ग्रामपंचायतीत सत्तांतर झालंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसला असून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पॅनेलचा दणदणीत विजय

सकाळी 10 वाजेच्या सुमारास जवळपास 667 ग्रामपंचायतींचे निकाल हाती. त्यापैकी 167 ग्राम पंचायती मिळवत भाजपाने राज्यात आघाडी घेतल्याचं चित्र आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात 122 ग्राम पंचायती आल्याचं दिसून येतंय. तर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात कोण बाजी मारतंय याकडेही सर्वांचं लक्ष आहे. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिंदे गटाच्या ताब्यात 108 ग्रामपंचायती आहेत.

कोल्हापूर : मुश्रीफ गटाला धक्का; कागल-करवीरमध्ये भाजपची सत्ता

पालघरमध्ये मनसेने खातं उघडलं, जयेश आहाडी सरपंचपदी

रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का बसला आहे. गणेशगुळे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व

नाशिक : चांदवडमध्ये तीन जागा भाजपकडे

राजुरीमध्ये सत्तांतर; विखे गटाच्या जनसेवा मंडळाचे डॉ. सोमनाथ गोरे गटाला सरपंच पदासह 10 जागा, जागा सत्ताधारी गटाला अवघ्या 2 जागा

नपावाडी ग्रामपंचायत - सरपंच विखे काळे गटाचे सरपंच पदासह 3 सदस्य विजयी, तर कोल्हे गटाचे 6 सदस्य विजयी.

राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सरुवात झाली आहे. रविवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहेत.

Related Stories

No stories found.