MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग तुमचे मत कसे नोंदवाल? जाणून घ्या...

MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग तुमचे मत कसे नोंदवाल? जाणून घ्या...

अहमदनगर | Ahmednagar

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ (Nashik Division Graduate Constituency) निवडणुकीचे (election) मतदान (voting) ३० जानेवारी, २०२३ रोजी होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी (Final voter list) जाहीर झाली असून नाशिक विभागात एकूण २ लाख ६२ हजार ७३१ मतदार (voter) आहेत.

दरम्यान मतदानासाठी काही दिवस शिल्लक असून उमेदवारांकडून प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी उमेदवार मतदारांना आवाहन करत आहेत. या निवडणुकीचे मतदान मतपत्रिकेवर होणार असून हे मतदान कसे नोंदवावे, हे मतदारांनी समजून घेणे आवश्यक आहे.

MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग तुमचे मत कसे नोंदवाल? जाणून घ्या...
“राजा का बेटा राजा नही बनेगा” म्हणत, सत्यजीत तांबेंच टेन्शन वाढवणाऱ्या शुभांगी पाटील आहेत तरी कोण?

मतदान करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतदान करताना केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केचपेननेच मत नोंदवावे. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपेनचा वापर करण्यात येऊ नये.

आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात ‘1’ हा अंक लिहून मत नोंदवावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता.

MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग तुमचे मत कसे नोंदवाल? जाणून घ्या...
MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2, 3, 4 इत्यादीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवता येतील. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा. तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये.

पसंतीक्रम हे केवळ 1,2,3 इत्यादी अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांमध्ये नोंदवू नयेत. पसंतीक्रम नोंदविताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे १, २, ३ इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपात I, II, III किंवा मराठी भाषेतील देवनागरी 1,2,3 या स्वरूपात नोंदवावे.

MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग तुमचे मत कसे नोंदवाल? जाणून घ्या...
राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले

मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविताना टिकमार्क ‘√’ किंवा क्रॉसमार्क ‘×’ अशी खूण करू नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल. आपली मतपत्रिका वैध ठरावी यासाठी आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.

दरम्यान विभागात सर्वाधिक मतदार अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar District) आहेत. अहमदनगरमध्ये १ लाख १५ हजार ६३८ मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात (nashik district) ६९ हजार ६५२, जळगाव जिल्ह्यत ३५ हजार ५८, धुळे जिल्ह्यात २३ हजार ४१२, नंदूरबार जिल्ह्यात १८ हजार ९७१ इतके मतदार आहेत.

MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग तुमचे मत कसे नोंदवाल? जाणून घ्या...
सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राख

विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे

नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही (Polling stations) संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या १४७ इतकी आहे. नाशिकमध्ये ९९, जळगाव जिल्ह्यात ४०, धुळ्यात २९ आणि नंदूरबार जिल्ह्यात २३ मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे आहेत.

MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग तुमचे मत कसे नोंदवाल? जाणून घ्या...
अत्याचार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या
MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग तुमचे मत कसे नोंदवाल? जाणून घ्या...
“मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचे…”; उर्फी जावेद प्रकरणी शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत
MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग तुमचे मत कसे नोंदवाल? जाणून घ्या...
...अन् सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, भर कार्यक्रमातच घटना; नेमकं काय घडलं?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com