पदवीधर मतदारसंघ निवडणूक: 'हे' कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

पदवीधर मतदारसंघ निवडणूक: 'हे' कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ (Graduate Constituency) निवडणुकीसाठी (election) दि.30 जानेवारीला मतदान (voting) होणार आहे.

या द्विवार्षिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर (voting center) मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे (documents) पुरावा म्हणून ग्राह्य राहणार आहे, असे निवडणूक आयोगाने (Election Commission) कळविले आहे.

हे पुरावे असणार ग्राह्य

आधार कार्ड (Aadhar Card), वाहन चालक परवाना (driving license), पॅन कार्ड (pan card), भारतीय पारपत्र, केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, खासदार (MLA)/आमदार (MP) यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र,

विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मुळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (Unique Disability Identity Card) इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com