जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक : मतमोजणीत 'सहकार' पॅनल आघाडीवर

' सहकार ' पॅनल पंधरा शून्यने आघाडीवर
जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक :  मतमोजणीत 'सहकार' पॅनल आघाडीवर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीची (Election of Zilla Parishad Employees' Cooperative Credit Society ) बिनविरोधाची हॅटट्रीक हुकल्यानंतर सत्ताधारी आपला व विरोधकांच्या सहकार पॅनलमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सहकार पॅनलचे नेते प्रमोद निरगुडे रवींद्र आंधळे व रवींद्र थेटे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने ( Sahkar Panel )15 शून्य आघाडी घेतली आहे.

सत्ताधारी आपला पॅनलचे ( Aapla Panel )नेते विजयकुमार हळदे यांच्या पॅनलला दारुण पराभव पत्करावा लागत आहे. सभासद मतदारांसमोर सहकार पॅनलने आपली बाजू मांडत मतदारांना परिवर्तनाची हाक दिली. यामध्ये सभासद मतदारांनीही सहकार पॅनलला साथ देत आपला पॅनलचे नेते हळदे यांच्यावरील रोष व्यक्त केल्याची भावना सहकार पॅनलच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

रविवारी (दि.६) पंधरा जागांसाठी नाशिकमध्ये मराठा हायस्कूल, गंगापूर रॉड येथे सकाळी ८ वाजता मतदानास सुरुवात झाली. दुपारी चार वाजता मतदान संपल्यानंतर याच ठिकाणी पाच वाजेला मतमोजणीस प्रारंभ झाला हळूहळू करत सहकार पॅनलचे नेते हे विजयाकडे घोडदौड करत होते विजय समीप दिसतात सहकार पॅनलच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी व उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहे.

विजय दृष्टीपथात असलेले सहकार पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे

सर्वसाधारण गट-सचिन अत्रे,अमित आडके,रवींद्र थेटे,रंजन थोरमिसे,नितीन पवार,चंद्रशेखर पाटील,सचिन पाटील, किशोर अहिरे, गणेश गायकवाड,नंदकिशोर सोनवणे,

इतर मागासवर्ग प्रवर्ग- विक्रम पिंगळे,

विमुक्त जाती जमाती प्रवर्ग-अनिल दराडे,

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग - मंगेश जगताप,महिला राखीव प्रतिनिधी गट(दोन जागा) अर्चना गांगोडे,सरिता पानसरे खैरे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com