Budget 2021 : पेट्रोल, डिझेलवर कृषी सेस, पण असा दिला दिलासा

डिझेलवर 4 रूपयांचा तर पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस
पेट्रोल
पेट्रोल

डिझेलवर 4 रूपयांचा कृषी सेस, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस लावण्यात आला आहे. परंतु दिलासाही दिला गेला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे कर कमी करुन त्यातून सुट मिळण्याची अपेक्षा असतांना डिझेलवर 4 रूपयांचा कृषी सेस, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस लावण्यात आला आहे. परंतु हा वाढीव भार ग्राहकांवर पडणार नाही, यासंदर्भात तरतूद केली असल्याची अर्थमंत्र्यांनी सांगितले. यावरील कस्टम ड्यूटी कमी करण्यात येणार आहे.

काय स्वस्त?

आयर्न स्टील- कस्टम ड्युटीत सूट मिळणार

तांबे- तांब्यावरील कस्टम ड्युटीत सूट

टेक्सटाईल्स – कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार

केमिकल- केमिकलवरील कस्टम ड्युटी कमी करणार

सोने-चांदी – कस्टम ड्युटी पुन्हा कमी करणार

चामड्याच्या वस्तू, गारमेंट- कस्टम ड्युटी कमी करणार

काय महाग?

अपारंपरिक ऊर्जा – सोलार पॅनल-इन्व्हर्टर – 5 वरुन 20 टक्क्यांवर

ऑटो पार्ट- काही गोष्टीवर कस्टम ड्युटी वाढवली

जेम्स स्टोन- कस्टम ड्युटी वाढवली

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com