नवी दिल्ली

कर्ज हप्तेच्या स्थगितीच्या काळातील (मोरॅटोरियम moratorium) व्याजाच्या रकमेवरील व्याज (चक्रवाढ) माफ करण्यास केंद्र सरकार तयार झाले आहे. यासोबत ज्या कर्जदारांनी नियमित हप्ते भरले आहेत, त्यांनाही दिलासा देण्याचा निर्णय केंद्र सरकर घेण्याच्या तयारीत आहे.

मोरॅटोरियम काळातील वैयक्तिक कर्जदारांबरोबरच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील कर्जदारांना व्याजवर व्याज माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे मार्च ते ऑगस्ट २०२० या कालावधीतील मोरॅटोरियमच्या काळातील व्याजावर बँकांकडून व्याज आकारले जाणार नाही. दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीच ही सवलत देण्यात आली आहे.

यांना मिळणार फायदा

एमएसएमई क्षेत्राच्या कर्जाबरोबरच शैक्षणिक, गृहकर्ज, वाहन कर्ज, ग्राहकोपयोगी कर्ज, क्रेडिट कार्डची थकबाकी, व्यावसायिक व इतर प्रकारच्या कर्जदारांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

सहा महिने मोरँटोरियम न घेणाऱ्यांना...

आता नियमित हप्ते भरणाऱ्यांनी सवलत देण्याची तयारी सरकारने सुरु केली आहे. अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिने नियमित हप्ते भरणाऱ्यांसाठी सरकार कँशबँकसारखा योजना घेऊन येणार आहे. या कर्जदारांनी मोरँटोरियमचा फायदा घेणाऱ्या लोकांसोबत आणण्याची तयारी सुरु आहे. मोरँटोरियमच्या कठीन काळात व्याज भरणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात येणार नसल्याचे सुत्रांनी सांगितले.