Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याअ‍ॅपनंतर चीनी TV ना भारतात बंदी

अ‍ॅपनंतर चीनी TV ना भारतात बंदी

नवी दिल्ली

गलवान घाटीतील सीमावादानंतर सरकार चीनबद्दल कठोर भूमिका घेताना दिसत आहे. चीनसंदर्भात भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनमधून कलर टेलिव्हिजनच्या (China TV) आयातीवर सरकारने बंदी घातली आहे. देशांतर्गत उत्पादन वाढविण्यास प्रोत्सहान देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारच्या हक निर्णय म्हणजत चीनवर आणखी एक स्ट्राइक मानले जात आहे.

- Advertisement -

डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (डीजीएफटी) ने कलर टेलिव्हिजन आयातीला मुक्त श्रेणीतून हटवून प्रतिबंधित केले आहे. व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया, इंडोनेशिया, थायलंड जर्मनी आणि चीनमधून भारतात प्रामुख्याने कलर टेलिव्हिजनची आयात होते. 36 सेमी ते 105 सेमीचे टीव्ही सेट आणि 63 सेमीपेक्षा कमी एलसीडी टीव्ही सेटवर या निर्णयाचा परिणाम होईल .गलवान घाटीतील सीमावादानंतर केंद्र सरकारने चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या