श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोविंदा सज्ज

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोविंदा सज्ज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा (Shri Krishna Janmashtami) सण गुरुवारी (दि. 18) साजरा होणार आहे. त्यासाठी कृष्णमंदिरे सजली असून दहीहंडीसाठी (Dahi Handi) गोविंदा( Govinda) सज्ज झाले आहेत.

देशभरात भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. देशभरातील कृष्णभक्त कृष्णाची उपासना करून उपवास करतात. कृष्ण जन्माष्टमी भारतभर गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी, श्रीजयंती नावाने साजरी होते.

रात्री बाराला जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी गोविंदा दहीहंडी सणाचा आनंद साजरा करतात. वैदिक पंचांगावर आधारित अष्टमी तिथी 18 ऑगस्ट रोजी रात्री 9:21 वाजता सुरू होईल आणि 19 ऑगस्ट रोजी रात्री 10:59 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 18 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल.

भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने त्यांचा जन्मोत्सव 18 ऑगस्ट रोजी साजरा होईल. गेली दोन वर्षे करोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे सण साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

मात्र, आता करोना संसर्ग कमी झाल्यामुळे यावेळी सर्व सण जल्लोषात साजरे केले जात आहेत. त्यासाठी यापूर्वीच राज्य सरकारने सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. दरम्यान, आता दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा गोपालकाला चांगलाच रंंगणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com