Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकराज्यपालांची आज ‘नॅब’ला प्रथमच भेट; संस्थापक अध्यक्ष देवकिसन सारडा यांचा विशेष सत्कार

राज्यपालांची आज ‘नॅब’ला प्रथमच भेट; संस्थापक अध्यक्ष देवकिसन सारडा यांचा विशेष सत्कार

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

दृष्टीबाधित बांधवांंच्या मदतीसाठी गेल्या 36 वर्षांपासून कार्य करणार्‍या ‘नॅब’ संंस्थेच्या मुख्यालयाला राज्याचे राज्यपाल पहिल्यांदाच भेट देत आहेत. त्यामुळे नॅब सदस्य व पदाधिकार्‍यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे.

- Advertisement -

‘नॅब’ संस्थेचे राज्यपाल पदसिध्द आश्रयदाते आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमनाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. वास्तूचे भूमिपूजन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज बुधवारी (दि.3) सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे. यावेळी नॅबचे संस्थापक अध्यक्ष देवकिसन सारडा यांचाही विशेष सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्यपालांच्या स्वागतासाठी नॅबमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.

नॅब मुख्यालयालगतच्या जागेत 60 मुलांना राहता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. दिव्यांगांच्या विषयात जे विद्यार्थी उच्चशिक्षण घेण्यासाठी येतील त्यांच्यासाठी हा निवासी प्रकल्प उभारण्यात येत आहे. एमपीएससी, यूपीएससी, संशोधन यांसारख्या उच्चशिक्षणाचे प्रशिक्षण आणि अद्ययावत ज्ञानाची माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या प्रकल्प उभारणीचा अंदाजे खर्च 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

यावेळी संचालकांकडून विविध प्रकल्पांची माहिती दिली जाणार आहे. निधी उपलब्ध झाल्यास भविष्यातील विविध प्रकल्पांची माहिती यावेळी दिली जाईल. त्यात प्रामुख्याने कर्णबधीर, अंधत्व व बहुविकलांग शाळेला अनुदानित करणे, बीएड स्पेशल समकक्षता देणे, शासकीय योजनांचा लाभ शीघ्रगतीने मिळवून देणे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा दिव्यांग निधी खर्च करण्यासोबतच विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या