
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) हे दि. २६ व २७ रोजी नाशिक आणि अहमदनगर दौऱ्यावर येणार होते. नाशिकसह अहमदनगरमध्ये त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. हा दौरा का रद्द झाला? याबाबत अद्याप समजू शकलेले नाही...
राज्यपाल पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच बैस नाशिकला येत असल्याने प्रशासनाने दौऱ्यासाठीची जय्यत तयारी केली होती. त्र्यंबकेश्वर पहिने गावाला भेट देतील. कालिदास कलामंदिर येथे नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव सांगता समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.
तसेच अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी, नेवासा तालुक्यातील देवगड आणि राहुरीच्या महात्मा फुले विद्यापिठाला भेट देणार होते. मात्र त्यांचा नाशिक आणि अहमदनगर दौरा अचानक रद्द झाला आहे.