
मुंबई | Mumbai
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु झाले असून शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला शिवसेना (Shiv Sena Symbol) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे...
त्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. तर आगामी निवडणुकीसाठी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन शिंदे-फडणवीस सरकारसाठी (Shinde-Fadnavis Government) अत्यंत महत्वाचे मानले जात असून अधिवेशनाची सुरुवात महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने झाली.
यावेळी अभिभाषणात नव्या राज्यपालांनी मराठा समाजासाठी (Maratha Community) राज्य सरकारच्या विशेष योजना, राज्यात ७५ हजार युवकांसाठी नोकरी भरत्या. जानेवारी २०२३ मध्ये १ लाख ३५ हजारांच्या गुंतवणुकीचे करार, जुन्या पेन्शन योजनेत बदल, अशा राज्य सरकारच्या विविध कामांचा लेखाजोखा आपल्या अभिभाषणाने पटलावर ठेवला.
तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) २४ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मिशन २०२५ योजनेची सुद्धा राज्यपालांनी माहिती दिली. याशिवाय युवकांसाठी गडचिरोली, गोंदियामध्ये प्रशिक्षण केंद्र तसेच राज्य सरकारने हाती घेतलेल्या मेट्रोच्या अनेक नव्या योजनांबाबतही राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी माहिती दिली.