राज्यपाल कोश्यारी आज नाशकात

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी (दि.3) म्हसरुळ येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे नुतनीकरण व सोलर रुफटॉप पॉवर सिस्टीमचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार असून, त्याचे झूम लिंकद्वारे ऑनलाईन प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.

दरम्यान, महसूलसह संपूर्ण यंत्रणेची नियोजनासाठीची धावपळ सुरु असून जवळपास संपूर्ण तयारीही झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचा नाशिक दौरा होत आहे.

त्यामुळे गर्दी नियोजनापासून तर सर्वच बाबींवर नियंत्रण राहाणे आवश्यक आहे. यासाठी महसूल यंत्रणा आणि पोलिसांनी आपले चोख नियोजन केले आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने या समारंभासाठीची सर्वच तांत्रिक नियोजनही केले आहे. त्यानुसार झूम मिटींग द्वारेही नागरिकांना हा कार्यक्रम ऑनलाईनद्वारे बघता येणार आहे. त्यासाठी आरोग्य विद्यापीठाच्या वतीनेलिंकही प्रसारित करण्यात आली आहे.

कार्यक्रमांसाठी पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रकुलगुरु डॉ. मोहन कामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण उपस्थित असतील.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *