"शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श तर...."; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य

नव्या वादाला तोंड फुटणार?
"शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श तर...."; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य

मुंबई | Mumbai

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद हे काही नवीन नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अधूनमधून काही विधाने करतात आणि त्यावरून वाद निर्माण होतो. त्यानंतर त्यांच्यावर सारवासारव करण्याचीही नामुष्की ओढवते. आता त्यांनी आज पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. तुलना करुनही ते थांबले नाहीत तर छत्रपती शिवराय हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं म्हणत शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं. राज्यपालांच्या वक्तव्याने नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

मराठवाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानद डि. लिट पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी आयोजित कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुलपती म्हणून या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com