राज्यपालांचा शिवसेनेला झटका : दिले या योजनेचे चौकशीचे आदेश


राज्यपालांचा शिवसेनेला झटका : दिले या योजनेचे चौकशीचे आदेश

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Cm Uddhav Thackeray) यांच्यातला लेटर वॉर राज्यात गाजला. हे प्रकरण संपले असतांना आता राज्यपालांनी ठाकरे सरकारला (Cm Uddhav Thackeray) आणखी एक झटका दिला आहे.


राज्यपालांचा शिवसेनेला झटका : दिले या योजनेचे चौकशीचे आदेश
मुलांचे लसीकरण : नोंदणी कशी करावी? कागदपत्रे काय लागतील?

मुंबई महापालिकेच्या (BMC)आश्रय योजनेत 1 हजार 844 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केली. भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. आश्रय योजनेतंर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यपालांनी आश्रय योजनेतील झालेला गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत.

काय आहे प्रकरण

सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेतून मुंबई मनपातर्फे पक्की घरे बांधली जातात. या योजनेच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या 39 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनते महापालिकेने 1 हजार 844 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावावर भाजपने आक्षेप नोंदवला होता. मात्र त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली.


राज्यपालांचा शिवसेनेला झटका : दिले या योजनेचे चौकशीचे आदेश
Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

याआधीही लोकायुक्तांना चौकशीचे आदेश

परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com