नाशिक

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे दोन दिवसाच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर सटाणा तालुक्यातील ठेंगोडा हेलिपॅडवर आगमन झाले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी राज्यपालांचे स्वागत केले. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे,आमदार दिलीप बोरसे, विशेष पोलिस महानिरिक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे आदी उपस्थित होते.

सटाणा येथील देव मामलेदार स्मारकाची राज्यपालांनी पाहणी व भूमिपूजन केले.