सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना ईशारा : कामावर न आल्यास पगारही नाही

सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना ईशारा : कामावर न आल्यास पगारही नाही

उच्च न्यायालयाचा (High Court) आदेश झुगारून संप सुरूच ठेवणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेविरोधात राज्य सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच एसटी महामंडळ प्रशासनाने (MSRTC Administration) आता संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलत 16 विभागांतील 45 आगारांमधील 376 कर्मचाऱ्यांचे निलंबन (Suspended) केले. आता सरकारकडून संपकऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.

सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना ईशारा : कामावर न आल्यास पगारही नाही
मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना हे भावनिक आवाहन

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले की, संप सुरू (ST bus strike) राहिल्यास एसटी कर्मचाऱ्यांची अडचण वाढेल. संप प्रकरणात भडकवणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. विलिनीकरणाची मागणी 1-2 दिवसांत होणार नाही. विलिनीकरणाच्या मागणीसाठी समिती नेमली आहे. निलंबनाची कारवाई घाईत केलेली नाही. कारवाई करण्याची इच्छा नाही, संप मागे घ्यावा. जर कामावर हजर न झाल्यास पगारही होणार नाही, असा इशारा परब यांनी यावेळी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com