Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशजगभरातील सर्व लसी भारतात मिळणार

जगभरातील सर्व लसी भारतात मिळणार

नवी दिल्ली

रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीला भारतात मंजुरी मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी मोठा निर्णय झाला आहे. देशातील लसीकरण वेगाने करण्यासाठी मंगळवारी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जगभरातील ज्या लसीचा अत्यावश्यक वापर केला जात आहे. त्या सर्व लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणार आहे.

- Advertisement -

भारतात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. आता लाखापेक्षा जास्त रुग्ण रोज होत आहे. आतापर्यंत देशात भारता बायोटेकची कोवॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस आहे. सोमवारी रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीला भारतात मंजुरी मिळाली. परंतु लसीकरण वेगाने होण्यासाठी जगभरातील ज्या लसीचा अत्यावश्यक वापर केला जात आहे, त्या लसींना मंजुरी देण्यात येणार आहे. यामध्ये यूएस फूड अ‍ॅन्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, युरोपियन मेडिसिन एजन्सी, यूके, पीएमडीए, एमएचआरए आणि जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केलेल्या सर्व लसींचा समावेश आहे.

भारतात रशियाची स्पुतनिक-व्ही लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी विकसित करत आहे. तसेच हिटरो बायोफार्मा व ग्लँड फार्मामध्ये त्याचे प्रोडक्शन होणार आहे.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) आणि भारतातील तज्ञ समितीने रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. आतापर्यंत भारतातील लसीकरण अभियानातील ही तिसरी लस आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या