Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशासनाला तातडीने मदत देण्यास भाग पाडू: दानवे

शासनाला तातडीने मदत देण्यास भाग पाडू: दानवे

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

सरस्वती नदीला (Saraswati River) आलेल्या पुराने (flood) थैमान घालून पाच दिवस उलटत आले तरीही नुकसानीचे पंचनामे (panchanama) पूर्ण झालेले नाहीत.

- Advertisement -

प्रशासन शेतकर्‍यांपर्यंत (farmers) पोहचलेच नसल्याचे दिसत असल्याने संतप्त झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve) यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

अजून पंचनामेच झाले नाहीत तर पूरग्रस्तांना (flood victims) मदत कुठून मिळणार असा प्रश्न करीत ना. दानवे यांनी राज्य शासनाचा (state government) प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोप केला. शासनाचे काम प्रभावी नसल्याचाही टोला त्यांनी मारला. या प्रश्नावर सरकारला धारेवर धरु व पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यास शासनाला भाग पाडू असेही ते म्हणाले. दि.1 सप्टेंबर रोजी झालेल्या विक्रमी पावसानंतर आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी ना. दानवे आज (दि.5) तालुका दौर्‍यावर आले होते.

तालुक्यातील सोनांबे येथील गुरदरी बंधार्‍याची पाहणी केल्यानंतर तेथील शेतकर्‍यांशी (farmers) त्यांनी चर्चा केली. त्यानंतर सिन्नरच्या (sinnar) ऐश्वर्य मंदिरासमोरील झोपडपट्टीतील रहिवाशांसह खासदार पुलाशेजारील व्यापारी संकूलातील व्यापार्‍यांची भेट घेत झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ना. दानवे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Shiv Sena District Chief Vijay Karanjkar), माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje), योगेश घोलप, उदय सांगळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, शहरप्रमुख गौरव घरटे, माजी नगरसेवक प्रमोद चोथवे, मनोज भगत, श्रीकांत जाधव, अशोक जाधव, राहुल भावसार यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

गुरदरी बंधार्‍याचा भराव वाहून गेला असून त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. मात्र, त्याचवेळी प्रशासन दाद देत नसल्याचा आरोपही शेतकर्‍यांनी केला. या बंधार्‍याचे पाणी शेतात शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी प्रशासनाकडून कुणीही आले नसून शेतकर्‍यांनीच आपल्या नुकसानीचे फोटो काढून पाठवावेत असे अधिकार्‍यांकडून सांगितले जात असल्याचे शेतकरी यावेळी म्हणाले. त्यावर ना. दानवे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

बंधार्‍याच्या दुरुस्तीचा 8 लाखांचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. त्यावर या खर्चातून केवळ भराव होईल व पाण्याचे झिरपणे सुरुच राहिल असे त्यांनी स्पष्ट केले. तात्पुरते काम न करता बंधार्‍याचे फाऊंडेशन सिमेंटचे बनवा आणि त्यानंतर काम करा. त्यासाठी बंधार्‍याचा पुन्हा वाढीव प्रस्ताव तयार करण्याची सूचना त्यांनी दिली. हा बंधारा फुटल्याने वाहलेल्या पाण्यातून 250 हेक्टर क्षेत्रातील टोमॅटो, सोयाबीनसारख्या पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली. परिसरातील 35 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील मातीही वाहून गेली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

त्यानंतर ना. दानवे यांनी सिन्नर शहरातील ऐश्वर्य मंदिरासमोरील झोपडपट्टीतील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. खासदार पुलावरील गाळेधारकांचीही त्यांनी भेट घेऊन झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. माजी नगरसेवक मनोज भगत, राहुल भावसार यांनी गाळेधारकांचे दु:ख सांगितले. पुराचे पाणी दुकानांमध्ये शिरल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची माहितीही त्यांनी दिली.

ग्रामीण भागातील नुकसानीचेही पंचनामे करा

सिन्नर तालुक्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेले पूरपाणी ग्रामीण भागातीलही अनेक घरांमध्ये शिरले. मात्र, त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतीमालासह शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा व्हायला पाहिजे होता. मात्र, तसेही झालेले नाही. त्यामुळे ना. दानवे यांनी आश्चर्य व्यक्त केले. संपूर्ण तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करा, प्रत्यक्ष शेतकर्‍यांपर्यंत पोहचा. पुरात पिके व जमिनीतील माती वाहून गेल्याने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा, मालमत्तांच्या झालेल्या नुकसानीचाही पंचनामा करण्याच्या सूचना ना. दानवे यांनी केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या