Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशमुलीच्या लग्नात सरकार देणार सोनं

मुलीच्या लग्नात सरकार देणार सोनं

मुलींच्या पित्यासाठी चांगली बातमी आहे. कारण आता मुलीच्या लग्नात तिला सरकारकडून सोने गिफ्ट म्हणून दिले जाणार आहे. येत्या जानेवारीपासून ही योजना लागू होणार आहे. अरुंधती स्वर्ण योजना असे या योजनेचे नाव आहे.

आसाम सरकारने अरुंधती स्वर्ण योजना नावाच्या एका योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेंतर्गत मुलींना विवाहात सरकारकडून १० ग्रॅम सोने (एक तोळा) भेट देण्यात येणार आहे. या योजनेसंदर्भात बोलतांना अर्थमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी सांगितले की, अरुंधती सुवर्ण योजनाचा लाभ अशा कुटुंबांना घेता येणार आहे.

- Advertisement -

ज्या कुटुंबांत एक किंवा दोन मुली आहेत. या योजनेचा लाभ तेव्हाच घेता येईल जेव्हा विवाहावेळी मुलीचे वय १८ वर्षांहून अधिक आणि मुलाचे वय २१ वर्षांहून अधिक हवे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांहून कमी असायला हवे. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी शासनाकडे माहितीसह एक अर्ज दाखल करावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या