कांद्यासाठी सरकारने बनवला बफर स्टॉकचा हा फार्मुला

कांदा उत्पादक शेतकरी
कांदा उत्पादक शेतकरी

नवी दिल्ली :

कांद्याचे दरवाढ व दर घसरणे हे दोन्ही प्रकार सरकारसाठी अडचणीचे ठरतात. आता अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत.

देशांतर्गत कांद्याचा बफर स्टॉक वाढवण्यासाठी योजना बनवण्यात आली आहे. यामुळे कांद्याच्या वाढत्या किंमतीतही दर वाढणार नाहीत. केंद्र सरकार कांद्याचा बफर स्टॉक १ लाख टनने वाढून १.५ लाख टन करणार आहेत. यामुळे येणाऱ्या काळात कांद्याच्या किंमतीत वाढ होताना दिसणार नाही. बफर स्टॉक वाढवला गेल्यानंतर जेव्हा मार्केटमध्ये कांद्याची कमी निर्माण होईल तेव्हा हा कांदा बाजारात उतरवला जाणार आहे.

सरकारने आतापर्यंत 99 हजार टन कांद्याची खरेदी किंमती स्थिर ठेवण्यासाठी केली आहे. त्यातील 63 हजार टन कांदा राज्यांकडे पाठवण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com