संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई; शासनाचा इशारा

मंत्रालय
मंत्रालय

मुंबई | Mumbai

 

राज्य सरकारने (State Govt) जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील जवळपास १८ लाख शासकीय- निमशासकीय कर्मचारी दि. १४ मार्च पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे शासकीय रुग्णालये, शाळा, कॉलेज, पालिका, बहुतांशी सरकारी विभाग ठप्प होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील आवाहन केले आहे.

या पार्श्वभूमीवर, दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे (Secretary Sumant Bhange) यांनी कळविले आहे.

मंत्रालय
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही ; भुजबळांचे सभागृहातून वॉक आउट

राज्य शासकीय कर्मचारी (State Government Employees) त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे.

या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत. या संपामध्ये राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मंत्रालय
Sheetal Mhatre Video : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र (Maharashtra) राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुकारलेला हा संप बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

मंत्रालय
जुनी पेन्शन योजना : मुख्यमंत्र्यांनी संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना केले आवाहन, म्हणाले...

केंद्र शासनाचे ‘काम नाही- वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने आज १३ मार्च २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप ( strike) मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये म्हणून शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे, असेही सचिव श्री. भांगे यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com