चीन वादावर सरकार संसदेत स्पष्टीकरण देणार

सोमवारपासून संसदेचे अधिवेशन
चीन वादावर सरकार संसदेत स्पष्टीकरण देणार

नवी दिल्ली:

भारत-चीन सुरु असलेल्या वादावर (India-China stand-off) संसदेत मोदी सरकारकडून स्पष्टीकरण दिले जाण्याची शक्यता आहे. संसदेचे अधिवेशन (Parliament) सोमवारपासून सुरु होत आहे. दरम्यान खासदारांची केलेल्या करोना चाचणीत पाच खासदार पॉझेटिव्ह आले आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (s jaishankar) आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची रशियाची राजधानी मॉस्को इथे दोन दिवसांपुर्वी चर्चा झाली. या चर्चेत पाच मुद्द्यांवर सहमती झाली होती. त्यापुर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि चीनचे चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंगे यांच्यातही चर्चा झाली होती. आता सोमवारपासून संसदेचे सत्र सुरु होत आहे. संसद समितीच्या बैठकीत आज हा मुद्दा ‌उपस्थित झाला. तसेच नियंत्रण रेषेवरील (LAC)परिस्थितीसंदर्भात राहुल गांधी सरकारवर वारंवार हल्ले करत आहेत.

भारतीय लष्कर आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) दरम्यान मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच निर्माण झालेला पूर्व लडाख भागात वास्तविक नियंत्रण रेषेवर तणाव कायम आहे. चुशूल, डेपसांग आणि पँगाँग सरोवराच्या परिसरासह सीमेवरील इतर भागांमध्ये तणाव विकोपाला गेला आहे. चिनी सैनिकांकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरी करण्याचा सतत प्रयत्न केला. २९ - ३० ऑगस्टच्या रात्री चीनी सैनिकांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील भागात घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com