सहा महिन्यांत पेट्रोल, डिझेल ऐवजी या इंधनावर धावतील गाड्या

सहा महिन्यांत पेट्रोल, डिझेल ऐवजी या इंधनावर धावतील गाड्या
नितीन गडकरी

कार किंवा बाईक चालवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलची (petrol diesel)गरज लवकरच संपणार आहे. काही महिन्यांत अशी बरीच वाहने येतील, जी डिझेल-पेट्रोलऐवजी इथेनॉल, मेथेनॉल, गॅसोलीनवर (gasoline and methanol or ethanol)चालतील. इथेनॉल हे डिझेल-पेट्रोलपेक्षा सुमारे 40 रुपये प्रतिलिटर स्वस्त पडेल आणि प्रदूषणही कमी होईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari )यांनी सांगितले. त्यासाठी कंपन्यांना फ्लेक्स फ्यूअल इंजनची (flex-fuel engines)निर्मिती करण्याचे केंद्र सरकारने वाहन कंपन्यांना सांगितले आहे.

नितीन गडकरी
ही बँक नव्हे, तर आयकर धाडीत सापडलेले कोट्यावधी रुपये

नितीन गडकरी म्हणाले की, सरकारने फ्लेक्स इंधन इंजिन असलेल्या वाहनांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये वाहन कंपन्यांना सहा महिन्यांत फ्लेक्स फ्यूअल इंजिन असलेली वाहने बाजारात आणण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात बजाव व टीव्हीएस मोटरने इंजिनाची निर्मिती सुरु केली आहे. य TVS मोटर्स आणि बजाज ऑटोने फ्लेक्स इंधन इंजिन असलेल्या दुचाकी व तीनचाकी गाड्याही सादर केल्या आहेत.फ्लेक्स फ्युएल इंजिनने सुसज्ज झाल्यानंतर, वाहने एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनावर धावू शकतील.

नितीन गडकरी
रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

100% इथेनॉलवर वाहने

फ्लेक्स फ्युएल इंजिन सुरू केल्याने 100% इथेनॉलवर ही वाहने चालवणे शक्य होणार आहे. यामुळे पर्यावरण तसेच लोकांच्या खिशावरील भार कमी होणार आहे.

पेट्रोल110 तर इथेनॉल 63 वर

सध्या देशातील अनेक भागात डिझेल आणि पेट्रोलचे दर 100 च्या पुढे आहेत, तर इथेनॉलची किंमत सध्या केवळ 63.45 रुपये प्रतिलिटर आहे. अशा प्रकारे, ते पारंपारिक इंधन डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 40 रुपयांनी स्वस्त आहे. ते पेट्रोलच्या तुलनेत 50 टक्के कमी प्रदूषण पसरवते. पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल वापरण्यामुळे मायलेज थोडे कमी मिळणार असले तरी, सरासरी बचत प्रति लिटर 20 रुपयांच्या आसपास आहे.

Related Stories

No stories found.