गोदा आरतीसाठी शासनाकडून निधी

आ. फरांदे यांच्या मागणीला यश; मुनगंटीवार यांची घोषणा
गोदा आरतीसाठी शासनाकडून निधी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशातील वाराणसी, हरिद्वार, अयोध्या आदी ठिकाणी शासनाच्या वतीने दररोज भाविकांसाठी भव्य आरती करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील प्राचीन व ऐतिहासिक गोदा घाटावरदेखील गोदा आरतीसाठी ( Godavari River Aarti ) पाच कोटी रुपये विशेष निधी मिळावा, अशी मागणी मध्य नाशिकच्या आ. देवयानी फरांदे ( MLA Devyani Farande )यांनी सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्याला यश मिळाले असून शासनाने पाच कोटी रुपये यासाठी दिले असून लवकरच 11 पुजार्‍यांची नेमणूक होऊन रोज सायंकाळी सहा वाजता गोदाघाटावर महाआरती होणार आहे.

नाशिक गोदाकाठावर गोदावरी नदीची महाआरतीची व्यवस्था करण्यासाठी खास बाब म्हणून 5 कोटी रुपयांचा निधीची मागणी करण्यात आली होती. गोदावरी ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. द्वीपकल्पीय नद्यांच्या दुसर्‍या उपनद्यांपैकी ही सर्वात मोठी आहे. तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. तीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे. अगदी रामायणातील पौराणिक काळाशी ही नाशिकचा फार घनिष्ठ संबंध आहे.

रामकुंड( Ramkund 0 हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते, अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्ह्यातील खटावचे जमिनदार चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये केले. श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली. रोज या ठिकाणी गोदावरी नदीची महाआरती केली जाते. परंतु पुरेशा सुविधा नसल्याने भाविकांचे हाल होतात. त्यामुळे गोदावरी तटावर गोदावरी नदीची महाआरतीची व्यवस्था करण्यासाठी विशेष निधी मिळावा, अशी मागणी आ. फरांदे यांनी पत्र देऊन केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com