Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedकरदात्यांना दिलासा : आयकर रिटर्न भरण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढवली

करदात्यांना दिलासा : आयकर रिटर्न भरण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढवली

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (Income Tax Return )करण्याची शेवटची तारीख वाढवण्याचा निर्णय सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत रिटर्न फाईल (Income Tax Return )न करणाऱ्या करदात्यांना दिलासा मिळाला आहे. याआधी रिटर्न भरण्याची मुदत दोन वेळा वाढविण्यात आली आहे

रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

- Advertisement -

ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची नवी अंतिम तारीख १५ मार्च असेल. याआधी ही मुदत दोन वेळा वाढविण्यात आली आहे. पहिल्यांदा ३१ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आणि त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत ती वाढविण्यात आली.

३.८३ कोटींहून अधिक रिटर्न भरले

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी १९ डिसेंबरपर्यंत ३.८३ कोटीहून अधिक कर रिटर्न भरले गेले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या